Navratri Celebrations
sakal
नाशिक
Nashik Navratri Celebrations : नाशिकमध्ये टिपऱ्यांच्या बाजारपेठेत गर्दी; दांडियाचा उत्साह शिगेला
Growing Popularity of Dandiya and Tipri in Nashik’s Navratri Celebrations : घरोघरी घटस्थापना केली जाते, तसेच सार्वजनिक ठिकाणी देवीच्या मूर्तींची स्थापना करून त्याभोवती गरबा आणि दांडिया खेळला जातो. दांडिया खेळण्याची युवा वर्गातील क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे यंदा टिपऱ्यांना मोठी मागणी आहे.
पंचवटी: नवरात्रोत्सव सोमवारी (ता. २२) सुरू होत आहे. घरोघरी घटस्थापना केली जाते, तसेच सार्वजनिक ठिकाणी देवीच्या मूर्तींची स्थापना करून त्याभोवती गरबा आणि दांडिया खेळला जातो. दांडिया खेळण्याची युवा वर्गातील क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे यंदा टिपऱ्यांना मोठी मागणी आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही गोदाघाटावरील म्हसोबा पटांगणाशेजारी, भाजी मंडईच्या पायऱ्यांजवळ घाऊक दरात टिपऱ्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
