Nashik Parking Problem : ‘नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग; कोंडीची समस्या जैसे थे

Nashik News : महाराष्ट्र दिनापासून शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये टोईंग कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Even though there are no parking signs on the road, there are many four-wheelers parked on the road.
Even though there are no parking signs on the road, there are many four-wheelers parked on the road.esakal

Nashik Parking Problem : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे असतानाही शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व नो-पार्किंगचा फलक असतानाही त्याठिकाणी दिवसभर पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांची टोईग करण्याकडे कानाडोळा केला जात आहे. तर दुसरीकडे ठराविक ठिकाणीच टोईगची कारवाई होते आहे. त्यामुळे या उद्देशासाठी टोईंग सुरू करण्यात आली, तो साध्य होत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. (Nashik negligence to Vehicles in no parking marathi news)

महाराष्ट्र दिनापासून शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये टोईंग कारवाई सुरू करण्यात आली आहे. नो-पार्किंगमधील वाहने आणि रस्त्यालगत वाहतुकील अडथळा ठरणाऱ्या वाहनांची टोईंग होत असल्याने बेशिस्त वाहनचालकांना दणका बसला आहे.

मात्र, टोईंग करताना वाहतूक पोलीस व टोईंग कर्मचाऱ्यांकडून ठराविक रस्त्यांवरील नो-पार्किंगमधील वाहनांचीच टोईग केली जात आहे. प्रत्यक्षात शहरात बहुतांशी ठिकाणी नो-पार्किंगचे फलक लावलेले असताना, तेथील वाहनांची मात्र टोईंग होताना दिसत नाही. त्यामुळे त्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे आहे.

टोईंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून मेळा बसस्थानक, सिटी सेंटर मॉल, टिळकवाडी रोड येथील नो-पार्किंगमधील दुचाक्या-चारचाकी वाहनांची टोईंग केली जाते. तर, एम.जी. रोडवरील नो-पार्किंगमध्ये चारचाकी वाहने असताना त्यांची टोईंग होत नाही. तर, नो-पार्किंग पट्ट्याबाहेरील दुचाक्यांची मात्र टोईंग केली जाते.

त्याचप्रमाणे, सार्वजनिक वाचनालयाकडून सांगली बँक सिग्नलकडे येणाऱ्या रस्त्याच्या कडेला नो-पार्किंगचा फलक लावण्यात आलेला आहे. असे असताना त्याठिकाणी सर्रासपणे चारचाकी वाहने पार्क केल्या जातात. मात्र, या वाहनांची टोईंग केली जात नाही. कॉलेजरोडवरही तशीच परिस्थिती आहे. यामुळे टोईंग वाहनावरील अंमलदार व कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचे बोलले जाते आहे. (Latest Marathi News)

Even though there are no parking signs on the road, there are many four-wheelers parked on the road.
Nashik Traffic Rule Break : नो पार्किंगमधील वाहनांच्या टोईंगने बेशिस्तांना दणका! 4 दिवसात अडीच लाखांचा ठोठावला दंड

या ठिकाणी सतत कारवाई

शरणपूर रोडवरील टिळकवाडी सिग्नल तर कुलकर्णी गार्डन रस्त्यावर मनपासमोर अनेक बँका आहेत. याठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. येथे एकापाठोपाठ एक वाहनांची टोईंग केली जाते. याचप्रमाणे, टिळकवाडी सिग्नलकडून जलतरण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनांची टोईंग होते.

इकडे दूर्लक्ष

स्मार्ट रोडच्या दुतर्फा सायकल ट्रॅक नो-पार्किंगमध्ये असताना चारचाकी वाहने आणि फुटपाथवर दुचाक्या सर्रासपणे पार्क केल्या जातात. या वाहनांची मात्र वाहतूक शाखेला टोईंग करण्याचा विसर पडतो. याबाबतही वाहनचालकांकडून जाब विचारला जातो. 

Even though there are no parking signs on the road, there are many four-wheelers parked on the road.
Traffic Issue : वाहतूक कोंडीने श्‍वास ‘कोंडला’! पिंपरी- चिंचवडसह मुंबईकरांचीही वाढली डोकेदुखी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com