Nashik Crime News : मयत विवाहिता अल्पवयीन; सासर-माहेरच्यांविरोधात गुन्हा

Nashik Crime : अंबड हद्दीतील दत्तनगरमध्ये गेल्या महिन्यात नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्त्या केली होती.
crime
crimeesakal

नाशिक : अंबड हद्दीतील दत्तनगरमध्ये गेल्या महिन्यात नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्त्या केली होती. याप्रकरणी पोलिस तपासात नवविवाहिता ही अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी मयत विवाहितेच्या आई-वडिलांसह सासू-सासरे व तिच्या पतीविरोधात बालविवाह प्रतिबंधक कलमासह पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ()

दरम्यान, शासनाकडून एकीकडे बालविवाहविरोधात कठोर कायदे असतानाही समाजात अजूनही बालविवाह होत असल्याचेच अधोरेखित होते आहे. कुंकूंम रितेश कोळी (रा. दत्तनगर, कारगील चौक, अंबड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. कुंकूम हिने ९ एप्रिल रोजी दुपारी राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्त्या केली होती. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद होती.

दरम्यान, या गुन्ह्यात तपास सुरू असताना धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. त्यानुसार अंबडचे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील यांच्या फिर्यादीनुसार, मयत कुंकूम हिची आई कल्पना सत्यवान कोळी (३७), वडील सत्यवान संपत कोळी (४४, रा. दत्तनगर, अंबड), सासू सुरेखा मोतीलाल सौंदाणे (४८), सासरे मोतीलाल उत्तम सौंदाणे (५४), पती रितेश मोतीलाल सौंदाणे (२१, सर्व रा. दत्तनगर, अंबड) या संशयितांविरोधात अंबड पोलिस ठाण्यामध्ये बलात्कार, पोक्सो कलम आणि बालविवाह प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Nashik Crime News : तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या 59 दलालांवर गुन्हा; मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाची कारवाई

मयत कुंकूक ही अल्पवयीन असतानाही तिच्या आई-वडील यांनी संशयित रितेश याच्यासमवेत ३१ जानेवारी २०२४ रोजी दसेगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे विवाह लावून दिला होता. तसेच, अल्पवयीन असतानाही तिला सासरी राहण्यास भाग पाडले.

त्याचप्रमाणे, संशयित पती रितेश यालाही मयत कुंकूम ही अल्पवयीन असल्याचे माहिती होते. तरीही त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. यामुळे माहेर व सासरच्यांकडील मानसिक त्रासाला कंटाळूनच तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे हे करीत आहेत.

शासनाचा फोलपणा उघड

शासनाकडून बालविवाहविरोधात कठोर कायदे केले आहेत. विविध समित्यामार्फत आढावाही घेतला जातो. यामुळे बालविवाहांना आळा बसल्याचा दावा वारंवार शासन व महिला आयोगाकडून केला जातो. परंतु प्रत्यक्षात समाजामध्ये बालविवाह सर्रासपणे होत असल्याचे या घटनेतून शासनाचा फोलपणाच उघड झाला आहे.

crime
Nashik Crime News : गावठी कट्ट्यासह गुंडाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com