Latest Marathi News | नाशिक : गळफास घेत 18 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Late Gauri Bhavsar

नाशिक : गळफास घेत 18 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक : भद्रकालीतील खैरे गल्लीतील १८ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातलगांनी केला आहे. गौरी मयूर भावसार (वय १८, रा. दीक्षित चाळ, खैरे गल्ली, जुने नाशिक) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. (Latest Marathi News)

गौरी हिने शनिवारी (ता. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

दरम्यान, तपासी पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गौरी हिचा तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. सासरच्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातलगांनी केला आहे. त्यामुळे अंत्यविधीप्रसंगी नातलगांनी संशयितांना अटक केल्याशिवाय अंत्यविधी न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी मृत नवविवाहितेच्या सासू-सासऱ्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितल्यानंतर अमरधाममध्ये तणावाच्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.