वणी येथे चोरांचा सुळसुळाट; शंखेश्वर मंदिरासह 3 ठिकाणी चोरी

वणीतील व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Theft
Theft esakal

वणी (जि. नाशिक) : वणी येथे वेगवेगळ्या ठिकाणी शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराच्या कार्यालयासह मोबाईल व किराणा दुकान फोडून एकूण ८९ हजार ४०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडल्याने वणीतील व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

येथील बसस्थानकाजवळील ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरमधील फिर्यादी जितेंद्र देवराम दुसाने, (वय 43) यांच्या महालक्ष्मी इलेक्ट्रीक अँण्ड मोबाईल शॉपी या दुकानाचे ता. ३० रोजी रात्रीच्या सुमारास दुकानाचा छताचे इंटेरियर तोडुन तसेच छताचे खालील भिंत फोडुन आत मध्ये प्रवेश करुन दुकानातील 62 हजार 900 रुपये किंमतीचे मोबाईल, ब्लुटुथ, बँटरी, पाँवरबँक, टॅब, स्मार्ट वाँच, रिपेरिंग मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. तसेच येथील कॉलेज रो़डवरील सुमित प्रविणकुमार बोरा यांच्या किराणा दुकानाचा पाठीमागील भागाचा पत्रा कापून अज्ञात चोरट्याने 14 हजार 500 रुपये किमतीचा किराणा व रोख रक्कम चोरुन नेली आहे.

Theft
नाशिक : गटारी अमावस्येच्या दिवशी 20 बकऱ्यांची चोरी

तसेच वणी नाशिक रस्त्यावरील शंखेश्वर पार्श्वनाथ मंदीराच्या कार्यालय व मंदिरातील स्टिलच्या बंद पेट्यामधील अंदाजे ७ हजाराची रुपयांची रोख रक्कम तसेच मंदिरातील कामगार याचा ३ हजार रुपये किमतीचा मोबाईल व २ हजार रुपये रोख रक्कम असा एकुण ८९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी चोरी करुन चोरुन नेला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वणी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे. एकाच रात्री तीन ठिकाणी झालेली घरफोडी व अन्य दोन ठिकाणी चोरीचा करण्यात आलेला प्रयत्न यामूळे व्यावसायिकांध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढवण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली आहे.

Theft
ईडी कारवाईच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका - CM शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com