Nashik News : संतापजनक! ऐन दिवाळीत समाजकंटकांकडून 3 गायींची निघृण हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime news

Nashik News : संतापजनक! ऐन दिवाळीत समाजकंटकांकडून 3 गायींची निघृण हत्या

नाशिक : वसुबारसपासून दिवाळीच्या सणाची नांदी सुरु झाली आहे. सर्वत्र उत्साहात सण साजरा होत असताना नाशिकरोड ते भगुर दरम्यान काही समाजकंटकांनी 3 गायींची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घडना रविवारी (ता. 23) उघडकीस आली आहे. समाजकंटकांनी केलेल्या या कृत्यामुळे नाशिककरांचा संताप अनावर झाला असून यासबंधीत दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा: Nashik Crime Update : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून युवतीवर अत्याचार; गुन्हा दाखल

दिवाळीची सुरुवात ही वसुबारसपासून होते. या दिवशी गाय- वासराचे मोठ्या भक्तीभावाने पुजन केले जाते. तसेच हिंदू संस्कृतीमध्ये गाय अत्यंत पवित्र मानली जाते. यंदाही दिवाळीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून शुक्रवार (ता. 21) रोजी शहरात सर्वत्र वसुबारसनिमीत्त मोठ्या भक्तीने गायीचे पुजन करण्यात आले. सणाची नांदी सुरु असतानाचा नाशिकरोड ते भगुर दरम्यान काही समाजकंटकांनी 3 गायींची निघृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिनही गायींचे पाय, मुंडके कापून त्यांची हत्या केल्याचा अत्यंत दुर्दैवी अन् निंदनीय प्रकार समोर आला आहे. ऐन सणासुदीत अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला. दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी उपस्थितांनी केली आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : ट्रायलच्या नावाखाली Activa केली लंपास

सदर प्रकाराबाबत लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिस प्रशासनाने नागरिकांना दिले. यावेळी मृत गायींचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावे अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी केली.

टॅग्स :NashikCrime NewsCow