Nashik News : वणीत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करा; सरपंच मधुकर भरसट यांची मागणी

Medical officer
Medical officeresakal

वणी : ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबरोबरच उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ रुग्णांना मिळवून देण्याची मागणी सरंपच मधुकर भरसट यांनी रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत केली.

Medical officer
Nashik News : मालेगावात ॲप्पल बोरची धूम! रोज पंधराशे कॅरेटची आवक

येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. सुनील राठोड, प्रभारी निवासी अधिकारी डॉ. अनंत पवार, रुग्ण कल्याण नियामक समितीचे सरपंच मधुकर भरसट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे यांच्या प्रमुख उपस्थित रूग्ण कल्याण समितीची बैठक झाली. या बैठकीत श्री. भरसट यांनी ही मागणी केली.

बैठकीप्रसंगी रुग्णालयातील स्वच्छता, पथदीप, रुग्णांशी असलेला सुसंवाद आदी रुग्ण ग्रामस्थांच्या तक्रारीवर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री. भरसट म्हणाले, की याठिकाणी प्रसूतीस आलेल्या महिलांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी जाण्याचे सांगत रेफर केले जाते. त्यामुळे महिलांचा नाहक प्रवासाचा त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक व स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करा अशी मागणी केली. त्यास ग्रामपंचायत सदस्य, सुनील कोरडे, जगन वाघ, राकेश थोरात, नामदेव गवळी, उत्तम राऊत, अनिल गांगुर्डे, दिगंबर पाटोळॆ, अमोल चोथवे आदींनी पाठिंबा दिला.

यावेळी डॉ. अनंत पवार, डॉ. राठोड यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे सांगून येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. महाले, डॉ. कानडे, डॉ. पवार, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना रूग्णाकडून कुठल्याच प्रकारची तक्रार यापुढे येता काम नये तसेच रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलांची प्रसूती याठिकाणी करण्यात यावी.

Medical officer
Nashik News : विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनातून उलगडला नाशिकचा 151 वर्षांचा इतिहास

त्यासाठी खासगी स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टरची नेमणूक करा. यासाठी शासनाकडून त्यांच्या फी साठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याची माहिती देखील डॉ. राठोड यांनी देत यापुढे गरज नसतांना नाशिक येथे प्रसूतीसाठी रेफर केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com