Nashik Fake Doctor : बालकाच्या मृत्यूप्रकरणी बोगस डॉ. नितीन फरगडे वर गुन्हा दाखल

Fake Doctor : आजाराचे योग्य निदान न करता हयगयीने उपचार करून निष्काळजीपणा करून दहा वर्षीय बालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dr. Nitin Fargade and
Aman Akhilesh Sharma
Dr. Nitin Fargade and Aman Akhilesh Sharmaesakal

अंबड : आजाराचे योग्य निदान न करता हयगयीने उपचार करून निष्काळजीपणा करून दहा वर्षीय बालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अखिलेश भिरीगुनाथ शर्मा (रा. जाधव संकुल, अंबड गाव, नाशिक) यांचा मुलगा अमन अखिलेश शर्मा (वय १०) याला ताप आला होता. ( nashik fake doctor case )

त्यावेळी फिर्यादी शर्मा यांनी त्याच्या मुलाला डॉ. नितीन फरगडे (रा. मारुती मंदिरासमोर, संजीवनगर, अंबड गाव, नाशिक) याच्याकडे नेले होते. डॉ. फरगडे याच्याजवळ कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना या बालकास ताप आलेला असताना आजाराचे योग्य निदान केले नाही, तसेच हयगयीने उपचार करून वैद्यकीय निष्काळजीपणा दाखवून बालकावर उपचार केले.

Dr. Nitin Fargade and
Aman Akhilesh Sharma
Nashik Fraud Doctor : जिल्ह्यात महिनाभरात सापडले चार मुन्नाभाई; बनावट डॉक्टरांविरोधात कारवाईचा बडगा

त्यामुळे या बालकाचा मृत्यू झाला. हा प्रकार दि. १३ ते १७ सप्टेंबर २०१९ दरम्यान ज्युपिटर हॉस्पिटल येथे घडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात डॉ. नितीन फरगडे यांच्याविरुद्ध बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.

Dr. Nitin Fargade and
Aman Akhilesh Sharma
Nashik Fake Doctors: नांदगावला बोगस डॉक्टरांच्या संख्येत वाढ! तालुक्यात 74 मुन्नाभाई कार्यरत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com