Nashik News : काकडगाव गावानजीक दिशाफलक नसल्याने काम बंद असलेल्या पुलाजवळ अपघाताची भीती

Nashik : पुलाचे काम पूर्ण करून वाहतूकीसाठी खुला करावा अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून केली जात आहे.
Under Construction Malegaon Nampur Road near Kakadgaon
Under Construction Malegaon Nampur Road near Kakadgaonesakal

अंबासन, (जि.नाशिक) : मालेगाव, नामपूर रस्त्यावरील काकडगाव गावानजीक असलेल्या पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून काही तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने सदर पुलाजवळ दिशाफलक नसल्याने अपघाताची (Accident) शक्यता बळावली आहे. पुलाचे काम पूर्ण करून वाहतूकीसाठी खुला करावा अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून केली जात आहे. (Nashik News malegaon nampur kakadgaon area bridge closed)

  अंबासन ते नामपूर रस्त्यावरील बिकट परिस्थितीतून वाहनचालकांना मार्गस्थ व्हावे लागत होते. याबाबत बांधकाम विभागाकडून दखल घेऊन युध्दपातळीवर सदर रस्त्यावर काम झाले मात्र काकडगाव गावानजीक असलेल्या वळण रस्त्यावरील पुलावरून वाहतूक धावण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाचे काम वीज महावितरण कंपनीच्या वीजवाहक तारा गेल्याचे कारण दाखवून पुलाचे काम बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वीच या पुलावरून जाणाऱ्या वीज महावितरण कंपनीकडून वीजवाहक तारा उंचीवर केल्या गेल्या असूनदेखील सदर पुलाचे काम आजतागायत बंद असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान याच पुलावरून जवळच असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थीसह मोराणे सांडस या गावाची रहदारी आहे. पुलावर खडीचा ढिग संबंधित ठेकेदाराने टाकून ठेवला असून या खडीच्या ढिगाऱ्याजवळ सुचनाफलक नसल्याने मोठा अपघात (Accident) होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Under Construction Malegaon Nampur Road near Kakadgaon
Sharad Pawar वर टीका करणाऱ्या Ajit Pawar यांना Rohit Pawar यांनी दाखवला आरसा; नेमकं प्रकरण काय?

या पुलाजवळून वाहनचालकांना मार्गस्थ होतांना मोठी कसरत करावी लागत आहे तर बहुतांश दुचाकीस्वार व मोठ्या वाहनचालकांना पुलावर सुचना फलक नसल्याने व कामाचा अंदाज येत नसल्याने खडीवर जाऊन आदळत आहेत. तसेच मोराणे सांडस गावाकडे ये-जा करताना पुलाच्या एका बाजूस खोलगट भाग असल्याने या खोलगट भागात मुरूम टाकून सुस्थितीत करावा व सदर पुल वाहनचालक, महाविद्यालयातील विद्यार्थीसह मोराणे सांडस वासियांसाठी खुला करावा अशी मागणी होत आहे. 

"काकडगाव महाविद्यालय ते मोराणे रस्ता अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे हा रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू बनलेला आहे. तसेच पुलाचे अपुर्ण काम पुर्ण करून वाहतूकीसाठी खुला करावा."- गंगाधर शेवाळे, उपसरपंच मोराणे सांडस

Under Construction Malegaon Nampur Road near Kakadgaon
Eknath Shinde: राज्यातील कोणीही उपचारावीना राहणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली जनतेला ग्वाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com