
Goda Mahaarti : गोदावरी ( Godavari ) नदीच्या जन्मोत्सवानिमित्त रविवारी (ता.१८) भव्य महाआरती करण्यात आली. दुपारी बाराला रामतीर्थावर मोठ्या उत्साहात व मंत्रोच्चाराच्या पठणात ही आरती झाली. सायंकाळी रामतीर्थावर साधूमहंतांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गोदावरी जन्मोत्सवानिमित्त फटाक्यांची आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. (Godavari birth festival Maha Aarti )
गंगा गोदावरी पुरोहित संघातर्फे सायंकाळी आठला गोदावरीची महाआरती करण्यात आली. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, थोर सन्यासी डॉ. सखा सुमंत महाराज, महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत अनिकेत शास्त्री यांसह भाविक गोदातीरी उपस्थित होते.
दुपारी जन्मोत्सवानिमित्त झालेल्या चित्रकला स्पर्धेत दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिलीप शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, वैभव दीक्षित, शेखर शुक्ल, अतुल गायधनी, प्रतीक शुक्ल, अमित पंचभय्ये, कुमार बेळे यांच्यासह नाशिककर उपस्थित होते. जन्मोत्सवानिमित्त रुद्राणी संत यांनी जन्मोत्सवाचे संकीर्तन सादर केले.
एकशे एक पुरोहितांनी विश्वकल्याणार्थ शांतिसूक्ताचे पठण केले. सायंकाळी रामतीर्थावर साधुमहंतांसह भाविकांची एकच गर्दी झाली. प्रारंभी चारही वेदांच्या विद्वानांनी वेदांचा जयघोष केला. यात वामन गुरुजी, पाठक गुरुजी, पळसकर गुरुजी व दिनकर गुरुजींनी मंत्रोच्चार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारीला गोदावरीची पूजा केली, त्याच ठिकाणी पुरोहित संघाने पाच चौथरे निर्माण करून त्या ठिकाणी आरती केली. वैद्यक पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी मंत्र पठण करत गोदावरीची पूजा केली. सनई चौघडे व शंखनाद करून गोदावरीच्या महाआरतीस प्रारंभ झाला. श्रीराम जयराम जय जय रामऽऽऽ रघुपती राघव राजाराम..पतीत पावन सीताराम...असा जयघोष करण्यात आला.
धूपआरती झाल्यानंतर साडेचार मिनिटांची मुख्य गोदावरी नदीची आरती झाली. एकसारखा पोशाख परिधान केलेल्या पाच युवकांनी गोदावरीची महापूजा केली. चार दिशांना आरती फिरवत समस्त देव-देवतांना नमन केले. साधूमहंतांनी आपल्या हाती आरती घेऊन गोदावरीची पूजा केली. ‘बोलो, गंगा माता कीऽऽऽ जय’, गोदावरी माता की जयऽऽऽ असा जयघोष करत भाविकांनी आरतीचा आनंद घेतला.
रामतीर्थ समितीतर्फे आज आरती
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे सोमवारी (ता.१९) सायंकाळी सातला गोदाआरती होणार आहे. या दोन्ही संघटनांमध्ये गोदाआरतीवरून वाद निर्माण झालेला असल्यामुळे रामतीर्थ सेवा समितीच्या सदस्यांनी रविवारी सांजआरतीला प्रेक्षकांमध्ये उपस्थिती दर्शवली.
रामतीर्थ समितीची आरतीसाठी थोर सन्यासी डॉ. सखा सुमंत महाराज यांच्या हस्ते आरती होईल. धर्मगुरू स्वामी अमृताश्रम महाराज हे मार्गदर्शन करतील. विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय मंत्री दादा वेदक, शहरातील आमदार, भाविक उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.