Goda Mahaarti : गोदाआरतीसाठी समितीला हवे पोलिस संरक्षण; आमदारांसह विविध संघटनांना निमंत्रण

Goda Mahaarti : वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरी महाआरतीस प्रारंभ होणार असला तरी दोन संघटनांमधील वाद आता टोकाला पोचला आहे.
Goda Mahaarti
Goda Mahaarti esakal

Goda Mahaarti : वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरी महाआरतीस प्रारंभ होणार असला तरी दोन संघटनांमधील वाद आता टोकाला पोचला आहे. या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी ( Godavari ) सेवा समितीने पोलिस संरक्षणाची मागणी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे. सोमवारी (ता. १९) परिस्थिती बघून त्यांना पोलिस बंदोबस्त देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ()

गोदावरी महाआरतीच्या अधिकारावरून निर्माण झालेला वाद शांत होण्याच्या मार्गावर दिसत नाही. गुरुवारी (ता. १५) गंगा गोदावरी पुरोहित संघाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना गोदाआरतीच्या अधिकाराचे पत्र दिले. त्यानंतर शुक्रवारी गोदावरी सेवा समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. गोदावरी नदी ही सर्वांची असून, तिची आरती करण्याचा अधिकार सर्वांना हवा.

रामतीर्थावर फक्त पुरोहित संघाचा अधिकार असणे चुकीचे आहे. तरीही आम्ही दुतोंड्या मारुतीजवळ गोदाआरतीस प्रारंभ करत असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी सातला ही आरती होणार असून, त्यासाठी श्रीमद् डॉ. सुमंताश्रम महाराज, धर्मगुरू श्री अमृत आश्रम स्वामी महाराज, ‘इस्कॉन’चे ब्रह्मचारी शिक्षाष्टकम दास, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक यांसह आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे व सरोज आहिरे यांना निमंत्रण दिले आहे.

Goda Mahaarti
Goda Mahaarti : गोदाआरतीचा प्रस्ताव 11 कोटीवर; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आढावा

पण पुरोहित संघासह साधू-महंतांनी या आरतीला विरोध केल्यामुळे येथे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरतीच्या वेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केली आहे. पोलिस संरक्षणात गोदाआरती होणार की त्यात काही विघ्न येणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघटनांचा अहवाल राज्याकडे

गंगा गोदावरी पुरोहित संघापाठोपाठ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले आहे. दोन्ही संघटनांचे म्हणणे व त्यांनी दिलेले लेखी पत्र जिल्हाधिकारी शर्मा यांनी राज्य शासनाकडे पाठविले आहे. यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे राज्य शासन त्यांना काय सूचना करते, यावरून पुढील दिशा निश्चित होणार आहे. वेळ पडल्यास दोन्ही संघटनांची एकत्रित बैठक घेण्याचा विचार सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Goda Mahaarti
Goda Mahaarti : गोदाआरतीच्या आडून राजकीय सूड; पुरोहितांसह भाजपमध्येच 2 गट

''गोदावरी नदी ही सर्वांची असल्यामुळे तिची कुणीही आरती करू शकतो. गोदाआरतीचा प्रारंभ सोमवारी होत असून, त्याचे निमंत्रण आम्ही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही दिले आहे. नाशिकची आरती भव्य स्वरूपातच होईल.''- जयंत गायधनी, अध्यक्ष, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती

''दोन्ही संघटनांने म्हणणे राज्य शासनाला कळविले आहे. त्यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.''- जलज शर्मा, जिल्हाधिकारी

Goda Mahaarti
Goda Mahaarti : लाठ्याकाठ्यांचा ‘महाप्रसाद’ स्वीकारणार! रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाआरतीची तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com