
Nashik : दिव्यांग अर्थसहाय्यात वाढ
नाशिक : शहरात दोन हजार ६१३ दिव्यांगांना विविध योजनांतून २०२१-२२ या वर्षात महापालिकेकडून एक कोटी १२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य वाटप झाले. शहरातील दिव्यांग शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून बेरोजगार दिव्यांगांना, विकलांगांच्या लाभासाठी शासनस्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहेत.
पहिली ते बारावी तसेच बेरोजगार दिव्यांग, पूर्ण विकलांग अशा विविध टप्प्यांत त्यांना अर्थसहाय्य देण्यात येते. पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी २० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रौढ, बेरोजगार दिव्यांगांना प्रतिमहिना दोन हजार रुपये, तर पूर्ण विकलांग दिव्यांगांना प्रतिमहिना दोन हजार रुपये अनुदान देण्यात येते. पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दरमहा लाभ देण्यात येतो. यामध्ये एकूण दोन हजार ६१३ दिव्यांग असून, त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. शहरातील जे दिव्यांग विद्यार्थी महापालिका शाळेत शिक्षण घेत असून, यापूर्वी या योजनेमधून ते वंचित आहेत त्यांनाही या वर्षात लाभ मिळवून देण्यात येणार आहे. बारावीनंतर पदवीपर्यंत प्रतिवर्ष २५ हजार रुपये, तर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याला ३० हजार रुपये प्रतिमहिना लाभ देण्यात येतो, असे उपायुक्त दिलीप मेनकर यांनी सांगितले.
हेही वाचा: सोनिया गांधींनी जुलैच्या अखेरीस म्हणणे नोंदवावे - ईडी
हेही वाचा: Maharashtra PoliticalCrisis: एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत अजितदादांची भाजपला क्लीनचिट
Web Title: Nashik News Increase In Divyang Financial Assistance
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..