Nashik News : इंदिरानगर वीज प्रश्न राजकारणाच्या सापळ्यात ? एकत्र प्रश्‌न सोडविण्याची नागरिकांची अपेक्षा

Nashik : वीजप्रश्‍नी एका राजकीय पक्षाने आवाज उठविला निवेदन, बैठक अधिकाऱ्यांशी चर्चा केली लगेच इतर पक्ष देखील तीच कृती करतात.
Citizens attending the meeting on electricity.
Citizens attending the meeting on electricity.esakal

Nashik News : ६ गेल्या अनेक वर्षांपासून नासर्डी ते पाथर्डी भागातील हजारो नागरिक त्रस्त असलेल्या वीज प्रश्नाचा आता महाविकास आघाडी आणि महायुती असा राजकीय आखाडा झाला की काय? अशी स्थिती झाल्याने असून किती दिवस सर्वसामान्यांना हाल होतील असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. वीजप्रश्‍नी एका राजकीय पक्षाने आवाज उठविला निवेदन, बैठक अधिकाऱ्यांशी चर्चा केली लगेच इतर पक्ष देखील तीच कृती करतात. ( Indira Nagar electricity problem is expected to be resolved )

मात्र प्रश्‍न सुटण्याऐवजी जैसे थे राहत असल्याने या प्रश्‍नाचा राजकीय आखाडा न करता सर्व पक्षांनी एकत्र येत हा प्रश्‌न सोडविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. लाखभर वस्ती असलेल्या इंदिरानगर, दीपाली नगर, विनयनगर, साईनाथ नगर, खोडे नगर, वडाळा गाव, राजीव नगर, चेतना नगर, सदिच्छा नगर यासह थेट पाथर्डी गावापर्यंतच्या दोन्ही बाजूला असणारा परिसर अनियमित वीज पुरवठ्याने हैराण झाला आहे. या भागाला उपनगर व द्वारका या ठिकाणाहून येणाऱ्या विजेवर अवलंबून राहावे लागते.

त्यामुळे दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून येथील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असतो. वीजप्रश्‍नी एका राजकीय पक्षाने आवाज निवेदन, बैठक, आंदोलन, अधिकाऱ्यांशी चर्चा केली लगेच इतर पक्ष देखील तीच कृती करतात. असा प्रकार अनेक वर्षापासून चालू आहे. मात्र, वीजप्रश्‍न जैसे थे राहिला आहे. आंदोलन, निवेदन दिले की, वीज कंपनी देखील जागा शोधते. आयुक्तांकडे सवलतीच्या दरात जागा मागते. जागा दिल्या जातात मात्र तेथून पुढे काहीच कार्यवाही होत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वारंवार पंचर होणारी मोठ्या शक्तीची केबल बदलणे, बॅकअपचा वीज प्रवाहाचा प्लान तयार ठेवणे या बाबींवरच वीज कंपनीची सर्व यंत्रणा आता खर्च होत आहे. मध्यंतरी माजी आमदारांच्या प्रयत्नातून झालेल्या आणि सध्या भग्नावस्थेत गेलेल्या सभागृह आणि वाचनालय परिसरात उपकेंद्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मग याच जागेचा अट्टहास का ? असा प्रश्न उपस्थित करत तिथे विरोध सुरू झाला. (latest marathi news)

Citizens attending the meeting on electricity.
Nashik News : कारची लोकल म्हणून नोंद तरीही 225 रुपये टोल वसूल; पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील प्रकार

यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नागरिकांना वाटले की आता आठ दिवसात उपकेंद्रांचा प्रश्न सुटेल. त्यांनतर नाही म्हणायला केबल टाकण्याचे काम सुरू झाले. नंतर स्मार्ट वीज मीटर आणि स्थानिक वीज प्रश्न हाती घेऊन माजी आमदारांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि आंदोलनाचा इशारा दिला. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या परिसराला २४ तास वीज मिळाली असा एकही परिसर शोधून सापडणार नाही हे वास्तव आहे.

पुन्हा बैठक

शनिवारी (ता.६) सायंकाळी पुन्हा एकदा परिसरातील वीजप्रश्‍नीझाली. मात्र या प्रकारच्या बैठकांना नागरिक देखील वैतागले असल्याचे दिसून आले. इंदिरानगर भागाच्या वीजप्रश्नाचे राजकीय भांडवल केले जात असून त्या माध्यमातून आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत राजकीय लाभ कसा घेता येईल यासाठी ही रणनीती आहे की काय? अशी शंकाआता नागरिकांना येत आहे. .जोपर्यंत स्वतंत्र उपकेंद्र होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही हे सत्य आहे. उपकेंद्रांची उभारणी हा मूळ प्रश्न मात्र आहे त्या परिस्थितीत असल्याने आगामी काळात देखील यावर कायमस्वरूपी मार्ग निघण्याचे कोणतेही चिन्ह सध्या तरी दृष्टिपथात नाही.

एकत्र येत लढण्याची गरज

काही वर्षांपूर्वी गांधीनगर येथील विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न समोर आल्यानंतर इंदिरानगरचा मोठ्या प्रमाणात रहिवासी भाग प्रस्तावित धावपट्टीसाठी आरक्षित होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या भागात असलेल्या उंच इमारतींचे भवितव्य देखील धोक्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक मंडळे यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून रस्त्यावर उतरले.

सर्वांनी एक दिलाने गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत धाव घेतली. सर्वांना सोबत घेऊन प्रश्न हाताळला गेल्याने प्रस्तावित विस्तारीकरण थांबले होते. याच पद्धतीने या वीजप्रश्नावर राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्याच पुढाऱ्‍यांनी एकत्र येऊन नागरिकांची डोकेदुखी ठरलेला हा प्रश्न सोडवण्याची अपेक्षा नागरिक करत आहेत.

Citizens attending the meeting on electricity.
Nashik News : गरिबीमुळे ‘तिचा’ जीवन संपविण्याचा निर्णय! सप्तशृंगगडावर सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचवले प्राण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com