Nashik News : नवीन वर्षात पोलिस आयुक्त शिंदेंकडून ‘पिंपरी-चिंचवड’ पॅटर्न

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Nashik Police Commissioner ankush shinde latest newsesakal

नाशिक : नाशिक शहर गुन्हेगारीमुक्त आणि राज्यातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून नावरुपाला येण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा संकल्प केला आहे.

आयुक्त शिंदे यांनी ‘पिंपरी-चिंचवड’मध्ये राबविलेला पॅटर्न नाशिकमध्येही अवलंबणार आहेत. नवीन वर्षात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी चार पथकांची निर्मिती केली असून, ही पथके नववर्षाच्या पहिल्या दिवसांपासून कार्यान्वित होणार आहेत. प्रामुख्याने शहरातील टवाळखोरीचा नायनाट करण्यासाठीचा ‘गुंडा स्कॉड’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मानस आयुक्त शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Nashik News : गतवर्षात नाशिककरांनी अनुभवला 3 पोलिस आयुक्तांचा कारभार

पोलीस आयुक्त श्री. शिंदे यांनी १६ डिसेंबरला नाशिक पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी कामकाजाचा आढावा घेत, नवनवीन सूचना व आदेश देत शहरातील दृश्‍य पोलिसिंगवर भर देण्यास सुरवात केली आहे. याच दरम्यान, शहरातील अनधिकृतरित्या उभारलेले होर्डिग्ज्‌ आणि त्याच्या आयोजकांवरच गुन्हे दाखल केले.

तसेच, दुचाक्यांच्या सायलेंसरमध्ये फेरबदल करीत कर्णकर्कश आवाज करीत रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने गेल्या काही महिन्यांपासून मरगळलेली शहर पोलिसिंग अचानक चार्ज झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांचा पुन्हा वचक निर्माण होतो आहे.

शहरातील पोलिसिंगमुळे नाशिक गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित शहर होण्यासाठी आयुक्त शिंदे यांनी ‘पिंपरी-चिंचवड’ पॅटर्नचा अवलंब नाशिकमध्येही करण्याचे संकेत दिले. त्यानुसार, चार पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. ही पथके नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कार्यान्वित होणार आहेत.

यामध्ये खंडणी, दरोडा व शस्त्रे, अंमली पदार्थ आणि गुंडाविरोधी पथक या चार पथकांचा समावेश आहे. त्यासाठी निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पथकांनी पोलिस ठाणेनिहाय संशयित, हिस्ट्री शीटर, सराईतांची यादी तयार केली असून, त्याचे नियंत्रण आयुक्तालयातून होणार आहे. विशेष म्हणजे, गल्ली-बोळातील गुंडांची धरपकड करुन कारवाईचे आदेश आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्याने नववर्षात गुन्हेगारीवर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Nashik Crime News: हाणामारीच्या घटनेने सिडको हादरले; तीक्ष्ण हत्यारांचा वापर

बालगुन्हेगारीकडे लक्ष

आयुक्त शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड येथे काम करताना बालगुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. सोशल मीडियावर आक्षेपार्ह छायाचित्रे टाकणे, वाढदिवसाचा केक शस्त्राने कापणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह रिल्स बनवून टाकणे अशा प्रकारे गुन्हेगारीकडे वळू पाहणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली होती.

याचप्रकारे नाशिकमध्येही मोहीम राबवून बालकांना गुन्हेगारीपासून अटकाव करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर, या बालकांचा गुन्हेगारीसाठी वापर करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना थेट कोठडीची हवा पोलिसांकडून दाखविली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com