
Nashik News : झुल्याची गाठ सुटल्याने थेट पाचव्या मजल्यावरून पडला प्लंबर
नाशिक : गंगापूर शिवारातील बहुमजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झुल्यावर बसून प्लंबिंगचे काम सुरू होते. त्यावेळी झुल्याची गाठ सुटल्याने पाचव्या मजल्यावरून थेट संरक्षण भिंतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३४ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यु झाला. सचिन रामदास देवरे (३४, रा. सुमंगल अपार्टमेंट, शिवाजीनगर, गंगापूर शिवार) असे मयत प्लंबरचे नाव आहे.
हेही वाचा: Nashik News : खबरदार! नायलॉन मांजा विकाल तर...; नवनियुक्त पोलिस आयुक्तांचा विक्रेत्यांना इशारा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी (ता. १७) गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमधील एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर सचिन देवरे हे झुल्यावर बसून नळ फिटींग प्लंबिंगचे काम करीत होते. सकाळी साडेनऊ वाजच्या सुमारास अचानक झुल्याची गाठ सुटली आणि सचिन हा झुल्यावरून इमारतीच्या खाली असलेल्या संरक्षण भिंतीवर कोसळला.
हेही वाचा: Nashik News : गोरज मुहूर्तांवरील लग्न वाहतुकीला डोकेदुखी; रस्त्यालगत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर
या दूर्घटनेमध्ये त्यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.