Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त; मुख्य मिरवणुकीत 5 मंडळ

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहर सज्ज झाले आहे.
nashik police
nashik policeesakal

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. शिवजयंतीनिमित्ताने काढण्यात येणारी मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी शहरात सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ()

त्याचप्रमाणे, मिरवणूक मार्गाला अडसर होऊ नये म्हणून वाहतूक मार्गातही बदल केलेले आहेत. मिरवणुकींमध्ये पारंपारिक वाद्य वाजविण्याचे आवाहन करतानाच, डीजे वाजविल्यास गुन्हे दाखल करण्याची तंबीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. शिवजयंतीनिमित्ताने उद्या (ता.१९) दुपारी मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ होणार आहे. शहरातील मुख्य मिरवणुकीला वाकडीबारव (भद्रकाली) येथून दुपारी प्रारंभ होईल.

ही मिरवणूक वाकडीबारव, दूधबाजार, विजयानंद टॉकीज, गाडगे महाराज चौक, मेनरोड, धुमाळ पॉईंट, सांगली बॅंक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट लेन, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, परशुराम पुरिया रोडने रामतीर्थावर मिरवणूक विसर्जित होईल.

भद्रकाली, सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शिवजयंती मिरवणूक मार्गस्थ होणार असल्याने त्यात या तीनही पोलीस ठाण्यांचे प्रमुख अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांची मिरवणुकीवर बारकाईने नजर असणार आहे.

nashik police
Shiv Jayanti 2024 : विश्व विक्रमी सुवर्ण होनचे काम अंतिम टप्प्यात; शिवजन्मोत्सवानिमित्त उपक्रम

दरम्यान, शिवजयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरवणूक शांततेच्या वातावरणात काढावी, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आवाहन केले आहे.

वाहतूक मार्गात बदल

शिवजयंती मिरवणुकीमुळे त्या मार्गावरील वाहतूक दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत मिरवणुकीतील वाहने वगळता अन्य वाहनांसाठी बंद असेल. तर, निमाणी व पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर बसेस पंचवटी बस आगारातून सुटतील. तर, ओझर, दिंडोरी, पेठकडून येणाऱ्या सर्व बसेस आडगाव नाकामार्गे कन्नमवार पुल, द्वारका सर्कलमार्गे नाशिकरोड, नाशिक शहरात मार्गस्थ होतील. तसेच पंचवटीत जाणारी वाहनेही याच मार्गाने जातील.

२२९ मंडळांना परवानगी

शिवजयंतीनिमित्त पोलीस आयुक्तालय हद्दीतील २२९ मंडळांनी पोलिसांकडून अधिकृत परवानगी प्राप्त केली आहे. तसेच, बॅनर तपासून पोलिसांकडून परवानगी दिली जात आहे. तर मुख्य मिरवणुकीसाठी ५ मंडळांनी तर, नाशिकरोडला ६ मंडळांनी नोंदणी केली आहे. मुख्य मिरवणुकीला भद्रकालीतील वाकडी बारव येथून दुपारी ४ वाजता प्रारंभ होईल आणि रात्री बारा वाजेपर्यंत मुदत आहे.

nashik police
Shiv Jayanti 2024 : झेंडे, पताकांमुळे अवघे शहर भगवेमय; शिवजयंतीचा उत्साह

असा आहे बंदोबस्त

- पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एक व दोनचा पोलीस बंदोबस्त :

- परिमंडळ एक :

पोलीस उपायुक्त - २

सहायक पोलीस आयुक्त - ३

पोलीस निरीक्षक - १५

सहायक व उपनिरीक्षक - ४०

पोलीस अंमलदार - ७००

होमगार्ड - २५०

- परिमंडळ दोन

पोलीस उपायुक्त - २

सहायक आयुक्त - ३

पोलीस निरीक्षक -१५

सहायक व उपनिरीक्षक - ४०

पोलीस अंमलदार - ५००

होमगार्ड - २००

याशिवाय दंगलविरोधी पथक, शीघ्रकृती दल, राखीव पोलीस दलाची तुकडी

nashik police
Shiv Jayanti 2024 : मिरवणुकांमुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल; वाहतूक पोलिसांचे नियोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com