Nashik News : मंगरुळ बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Nashik News : मंगरुळ बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह

सोग्रस : चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील बस स्थानकाजवळ ४५ वर्षीय पुरुषचा मृतदेह आढळून आला. योगेश धोमसे (रा. मंगरूळ) यांनी चांदवड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.

मंगरूळ बस स्थानकाजवळ अनोळखी व्यक्ती झोपलेल्या असताना त्यास काही ग्रामस्थांनी उठवण्याचा प्रयत्न केला असता तो काहीच हालचाल करीत नसल्याचे त्यांना जाणवले. ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेद्वारे त्यास उपचारांसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत म्हणून घोषित केले.

टॅग्स :Nashikdeath