Nashik News: द्राक्ष निर्यातदारांना पेमेंटसाठी ‘वेट ॲन्ड वॉच’

black grapes
black grapes esakal

पंचवटी : अवकाळी पाऊस असो की नैसर्गिक आपत्ती असो, अशा प्रत्येक संकटाला तोंड देत तळहाताच्या फोडवाणी जपत मोठ्या कष्टाने पिकविलेल्या द्राक्ष मालाच्या हक्काच्या पैशांसाठी निर्यातदार शेतकऱ्यांना तब्बल तीन महिने वाट पहावी लागत असल्याची परिस्थिती समोर आली आहे. या शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी माजी खासदार तथा नाशिक बाजार समितीचे माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी पुढाकार घेतला आहे.

यासाठी पिंगळे यांनी द्राक्ष बागायतदार संघाला पत्र दिले असून, पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

black grapes
Nashik News : चांदवड, देवळा, कळवणमधील 9 कृषी निविष्ठा केंद्रांचा परवाना निलंबित?

कोरोना काळात द्राक्षाला मागणी नव्हती, त्यानंतर बेमोसमी पावसाने सलग दोन वर्षे द्राक्ष पीक हातातून गेले होते. त्यामुळे सलग तीन वर्षे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र, यंदा नुकसान कमी झाल्याने द्राक्ष पीक चांगल्या स्थितीत आहे. यंदाच्या थंडीचाही काही फारसा फटका बसलेला नाही. द्राक्षाची लागवडही यंदा अधिक आहे, त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे.

परिणामी निर्यात ही वाढणार आहे परंतु, निर्यात केलेल्या मालाची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्याना तब्बल तीन महिने वाट पाहावी लागत आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी पिंगळे यांच्याकडे कैफियत मांडली.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

ही बाब लक्षात घेऊन पिंगळे यांनी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघास पत्र दिले. पिंगळे यांच्या पुढाकारामुळे द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांना उभारी मिळाली आहे. अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, माझे कर्तव्य असून, त्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

''कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे द्राक्ष निर्यातीत घट झाली होती. या वर्षी द्राक्ष उत्पादन चांगले आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यात वाढणार आहे. परंतु, मालाचे पैसे येण्यासाठी तीन - तीन महिने वाट पाहावी लागते. यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मालाचे पैसे पंधरा दिवसांत कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे.'' - देविदास पिंगळे, माजी खासदार तथा माजी सभापती बाजार समिती, नाशिक.

black grapes
Nashik News : पोलिसांची ग्रीन जिम अडकली वाहनांच्या विळख्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com