.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चांदोरी : निफाड तालुक्यात उत्पादित केलेल्या रसाळ उसाला परराज्यात रसवंतीगृहाच्या चालकांकडून प्रचंड मागणी आहे. उसाला प्रतिटन ३००० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. सध्या निफाडमधून राजस्थान, दिल्ली, हरियाना, मध्यप्रदेश व जम्मू काश्मीर येथे दररोज रसवंतीसाठी दोन हजार टन तर इतर वेळी ४०० ते ६०० टन ऊस जात आहे. येथील उसाच्या गोडीमुळे ही मागणी वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (Niphad sugarcane High demand in north)