Nashik NMC News : महापालिकेची अग्निशमन यंत्रणा ढासळली! शिकाऊ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अग्निसुरक्षा

Nashik NMC : आग लागण्याच्या दुर्घटनेपासून वाचविण्याची जबाबदारीदेखील नाशिककरांनो तुम्हाला घ्यावी लागेल, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
Nashik NMC News
Nashik NMC Newsesakal

Nashik NMC News : प्रॉपर्टी खरेदी करताय किंवा आधीपासूनच तुमची स्वमालकीची प्रॉपर्टी असेल तर आग लागण्याच्या दुर्घटनेपासून वाचविण्याची जबाबदारीदेखील नाशिककरांनो तुम्हाला घ्यावी लागेल, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्याला कारण म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीच्या सुरक्षेची जबाबदारी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाची असली तरी पुरेशी यंत्रणा नाही. (Nashik NMC Municipal fire fighting system collapse marathi News)

अग्निशमन केंद्रे तर सोडाच शिकाऊ व मानधनावरील अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर महापालिकेची अग्निशमन सेवा अवलंबून आहे. शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढत असताना पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेने १९९२ मध्ये अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण सुरू केले. त्या वेळच्या लोकसंख्येचा विचार करता त्या वेळी सक्षम अशी अग्निशमन यंत्रणा होती.

२०११ नंतर मात्र दुर्लक्ष होत गेले. २०११ च्या लोकसंख्येनुसार जी स्थिती अग्निशमन दलाची आहे. तीच स्थिती तेरा वर्षानंतरही कायम आहे. शहरात २५ मजल्याच्या वर इमारती बांधकाम सुरू झाले आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय व आरोग्य विभागाइतकीच अग्निशमन सेवा सक्षम असणे गरजेचे आहे. परंतु अतिशय महत्त्वाच्या या सेवेकडे दुर्लक्ष होत आहे. सद्यःस्थितीत ‘ड’वर्ग नगरपालिकाप्रमाणे अग्निशमन सुविधा आहे.

पुन्हा परवानगी

तातडीची बाब म्हणून कोरोनाकाळात शासनाने अग्निशमन व वैद्यकीय विभागातील ३४८ पदे भरण्यास मंजुरी दिली. पदांची भरती करण्याचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसला देण्यात आले. परंतु पदे भरण्याची मुदत संपुष्टात आल्याने आता नव्याने पदे भरण्याची परवानगी आवश्‍यक राहणार आहे..(latest marathi news)

Nashik NMC News
Nashik NMC News : बेकायदा होर्डिंग्ज ताब्यात घेण्याची कारवाई सुरू

ही महत्त्वाची पदे आहेत रिक्त

फायरमन, लीडिंग फायरमन, चालक किंवा यंत्रचालक, वायरलेस ऑपरेटर, सब ऑफिसर्स, स्टेशन ऑफिसर, फायर ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफिसर.

अग्निशमन सेवेतील त्रुटी

- एक लाख लोकसंख्या किंवा १० चौरस किलोमीटर मागे किमान एक अग्निशमन केंद्राचे प्रमाण आहे. सद्यःस्थितीत सहा अग्निशमन केंद्रे आहेत. प्रत्यक्षात लोकसंख्येचा विचार करता २२ केंद्रे हवीत.

- सहा केंद्रात २९९ इतके फायरमन मंजूर आहेत. परंतु सद्यःस्थितीत १८ फायरमन तर ६० लिडींग फायरमन कार्यरत आहे.

सद्यःस्थितीतील अग्निशमन केंद्रे

- सिडको, सातपूर, नाशिक रोड, अमृतधाम, मखमलाबाद नाका, शिंगाडा तलाव.

प्रस्तावित अग्निशमन केंद्रे

- गांधीनगर, गंगापूर रोडवरील होरायझन ॲकॅडमी समोर, दसक-पंचक.

''मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अग्निशमन केंद्रांची संख्या वाढविता येत नाही. तीन वाढीव केंद्रांचे प्रस्ताव आहेत.''- संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.

Nashik NMC News
Nashik NMC News : रस्ता खोदकामात केबल तुटल्यास बदलण्याची जबाबदारी ठेकेदाराची!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com