Nashik NMC News: पंपिंग स्टेशनसह जलकुंभांवर सेन्सर! स्मार्ट सिटीकडून पाण्याच्या थेंबाच्या हिशोबासाठी प्रणाली

Nashik News : नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून गावठाण पुनर्विकास हाती घेण्यात आला आहे.
NMC News
NMC Newsesakal

Nashik NMC News : घराघरांत महापालिकेकडून पोचविल्या जाणाऱ्या पाण्याच्या थेंब अन् थेंबाचा हिशोब लावण्याच्या अनुषंगाने व्यावसायिक नळ जोडणीत स्काडा तंत्रज्ञान वापरले जात असताना आता जलकुंभ, पंपिंग स्टेशन व जलशुद्धीकरण केंद्रांवरही स्काडा मीटर बरोबरच सेन्सर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटी कंपनीकडून तसा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आला. (Nashik NMC Sensors on water bodies with pumping station)

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून गावठाण पुनर्विकास हाती घेण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात चोवीस तास पाणी पुरवठा योजना राबविली जात आहे. योजनेत पंचवटी व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचा पुनर्विकास सुरु आहे.

पुनर्विकासासाठी मृदा चाचणी व नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आरेखन करण्यात आले आहे. गावठाणात पाणी पुरवठ्यासाठी स्काडा प्रणाली वापरली जात आहे. स्काडा प्रणालीसाठी डेटा संकलन करण्यासाठी महापालिकेच्या ११० जलकुंभांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

स्काडा प्रणालीत व्यावसायिक पाण्याचे मीटर बसविण्यासाठी साठ ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण करून सुमारे दहा हजार मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता पुढील टप्प्यात ११५ जलकुंभ, सात जलशुद्धीकरण केंद्रे, आठ पंपिंग स्टेशनमधील यंत्रांवर स्काडा मीटर बरोबरच फ्लो मीटर सेन्सर बसविले जाणार आहे.

या बाबींची होणार तपासणी

जलकुंभ, पंपिंग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्राद्वारे वितरित पाणी, शुद्ध होऊन वितरित होणारे पाणी, स्वच्छ पाणी, पाण्याची पातळी, पाण्याचा वेग, पाण्याचा दाब, पाण्यातील क्लोरिनचे घटक या घटकांची फ्लो मीटर सेन्सरद्वारे तपासणी होणार आहे. (Latest Marathi News)

NMC News
Nashik NMC News : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महिला मेळावे! मतदानाला प्रोत्साहित करण्यासाठी उपक्रम

येथे बसणार फ्लो सेन्सर मीटर

- ११० जलकुंभ.

- शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्र.

- गांधी नगर जलशुद्धीकरण केंद्र.

- नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र.

- बोरगड पंपिंग स्टेशन.

- बुधवार पेठ पंपिंग स्टेशन.

- चेहेडी बंधारा पंपिंग स्टेशन.

- द्वारका पंपिंग स्टेशन.

- गोपाल नगर पंपिंग स्टेशन.

- नवीन चुंचाळे पंपिंग स्टेशन.

- जुने चुंचाळे पंपिंग स्टेशन.

- सावता नगर पंपिंग स्टेशन.

"पाण्याचा अचूक हिशोब लावण्यासाठी स्काडा तंत्रज्ञानावर आधारित फ्लो मीटर सेन्सर बसविण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीचा आहे."

- अविनाश धनाईत, अधिक्षक अभियंता, यांत्रिकी विभाग.

NMC News
Nashik NMC School: गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या शाळांना पारितोषिक! गुणवत्ता वाढविण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाचा उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com