Nashik NMC News : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महिला मेळावे! मतदानाला प्रोत्साहित करण्यासाठी उपक्रम

Nashik News : महापालिका हद्दीमध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी असल्याची नोंद झाल्याने स्विप योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केल्या जात आहे.
NMC News
NMC Newsesakal

Nashik NMC News : महापालिका हद्दीमध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी असल्याची नोंद झाल्याने स्विप योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

आतापर्यंत चार हजार महिलांनी या मेळाव्यात सहभाग घेतलेल्या अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त व स्विप च्या प्रमुख नोडल अधिकारी स्मिता झगडे यांनी दिली. (Nashik NMC Women increase voting percentage)

स्वीप योजनेअंतर्गत योजनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमती झगडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

त्याअनुषंगाने नोडल अधिकारी म्हणून विविध उपक्रम राबविले जात आहे. मतदार जागृतीसाठी शहरातील दीडशे प्रमुख चौकांमध्ये फलक उभारण्यात आले. ३९७ घंटागाड्यांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोचविले जात आहे. सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदान जागृती रॅली अभियान राबविण्यात आले.

शहरात साडे पाच लाख मालमत्ता धारक असून या मालमत्ताधारकांना घरपट्टीच्या देयके वाटप करताना त्यावर मतदान जागृतीचा संदेश पाठवण्यात आला आहे. कर संकलन केंद्रावर देखील कर भरल्याची पावती देताना त्यावर मतदानाचे महत्त्व सांगणारा संदेश नमूद केला जात आहे. (Latest Marathi News)

NMC News
Nashik Lok Sabha Election 2024: राजाभाऊ वाजे 14 कोटी 80 लाखांचे धनी! 2019 च्या विधानसभेच्या तुलनेत जंगम मालमत्तेत दुपटीने वाढ

विविध पर्यायांचा वापर

निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी महिला बचत गट व अंगणवाडी सेवकांची मदत घेतली जात आहे. महिला बचत गटांचे विभाग पातळीवर मेळावे आयोजित करण्यात आले असून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. आत्तापर्यंत चार हजार महिलांनी बचत गटांच्या मेळाव्यांमध्ये सहभाग नोंदविला.

मतदारांना आपले नाव कुठल्या मतदान केंद्रावर आहे, याची माहिती व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने ॲप उपलब्ध करून दिले आहेत. या ॲपच्या माध्यमातून देखील मतदारांपर्यंत माहिती पोचविली जात आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्या अनुषंगाने देखील उपाययोजना केल्या जात आहे.

मदत केंद्र पाळणाघर दिव्यांगांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह आदी १४ प्रकारच्या सुविधा महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सक्षम ॲपच्या माध्यमातून वृद्ध दिव्यांगांची नोंदणी केली जात आहे. विविध सामाजिक स्वयंसेवी संघटनांनीही मतदार जागृती मोहिमेत सहभाग नोंदविल्याची माहिती झगडे यांनी दिली.

NMC News
Nashik ZP News: दिव्यांग पडताळणीकडे जि. प. कर्मचाऱ्यांची पाठ! नोटिसा बजावूनही 187 कर्मचाऱ्यांनी काढले नाही UDID क्रमांक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com