NMC Election : महापालिका निवडणुकीपूर्वी झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण; झोपड्या, मतदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

NMC Election : आर्थिक तरतूद व मनुष्यबळ नसल्याने शहरातील झोपडपट्ट्यांचे रखडलेले सर्वेक्षण महापालिका निवडणुकीपूर्वी मार्गी लावले जाणार आहे.
NMC
NMCesakal

NMC Election : आर्थिक तरतूद व मनुष्यबळ नसल्याने शहरातील झोपडपट्ट्यांचे रखडलेले सर्वेक्षण महापालिका निवडणुकीपूर्वी मार्गी लावले जाणार आहे. सर्वेक्षणासाठी बाह्य यंत्रणेची मदत घेतली जाणार असून तेरा वर्षात झोपडपट्टी व त्यातील झोपड्यांच्या संख्येसह लोकसंख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. शहराचा विस्तार वाढत असताना झोपडपट्ट्यांची संख्या देखील वाढत असल्याचे निदर्शनास आले आहेत. ( NMC Slum Survey before Municipal Election )

२०११ मध्ये शहरात झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात १५९ झोपडपट्ट्या असल्याचे निदर्शनास आले होते. यातील ५५ झोपडपट्ट्या अधिकृत तर १०४ झोपडपट्ट्या या अनधिकृत आढळून आल्या होत्या. ८२ झोपडपट्ट्या खासगी जागेवर तर महापालिकेच्या जागेवर सहा व शासकीय जागांवर १६ झोपडपट्ट्या असल्याचे निदर्शनास आले होते. असे असले तरी मागील तेरा वर्षाचा झोपडपट्ट्यांची नव्याने सर्वेक्षण करण्याची आवश्यकता होती.

त्याच अनुषंगाने ऑगस्ट २०२३ मध्ये विधानसभेत आमदार सीमा हिरे व आमदार देवयानी फरांदे यांनी झोपडपट्ट्या नियमित करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. पावसाळी अधिवेशनात नगर विकास विभागाने शहरातील अघोषित झोपडपट्ट्यांचे संरक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या माध्यमातून झोपडपट्टी धारकांना शासकीय घराचा लाभ घेण्याचे नियोजन होते. झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देखील महापालिकेला आल्या होत्या.

मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विभाग, स्लम विभाग, नगररचना विभाग व भूसंपादन विभागाकडून कुठलीच प्रक्रिया झाली नाही. सर्वेक्षण करण्यासाठी आर्थिक तरतूद देखील करण्यात आली नाही. त्यानंतर मनुष्यबळ नसल्याचे कारण देत सर्वेक्षण झाले नाही. परंतु आता महापालिका निवडणूक होण्यापूर्वी महापालिकेच्यावतीने सर्वेक्षण केले जाणार आहे. या माध्यमातून शहरात वाढलेल्या झोपडपट्ट्या व त्यातील लोकसंख्येची आकडेवारी समोर येणार आहे.(Latest Marathi News)

NMC
NMC Election : महापालिका निवडणुका लांबणीवर

बाह्य यंत्रणा करणार सर्वेक्षण

महापालिकेच्या स्लम विभागाकडे मनुष्यबळ नाही. त्यामुळे बाह्य यंत्रणेमार्फत झोपडपट्ट्या व त्यात व्हाट्सअप करणाऱ्या लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणासाठी विशेष आर्थिक तरतूद केली जाणार आहे.

''मनुष्यबळ अभावी झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण रखडले. नव्याने सर्वेक्षणासाठी बाह्य एजन्सी नियुक्त केली जाणार असून लोकसभा निवडणूक आचारसंहितेनंतर सर्वेक्षण होईल.''- नितीन नेर, उपायुक्त, स्लम विभाग.

शहरातील झोपडपट्ट्यांची स्थिती

एकुण झोपडपट्ट्या १५९

घोषित ५५

अघोषित १०४

घोषित झोपड्यांची संख्या २०,८८५

घोषित झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्या ९७,१२६

अघोषित झोपड्यांची संख्या २०,५२२

अघोषित झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्या ९५,८३३

खासगी जागेवरील झोपडपट्ट्या ११४

महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्ट्या १५

शासकीय जागांवरील झोपडपट्ट्या ३०

NMC
NMC Election: सत्ताधाऱ्यांनी इच्छुकांच्या कानात फुंकले रणशिंग! इच्छुकांच्या अंगात बळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com