Nashik NMC : महापालिकेकडून फक्त नोटिसांचा सोपस्कार; धोकादायक इमारती तपासण्याची यंत्रणा अनुपलब्ध

Nashik News : शहरातील जुन्या इमारती ढासळण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारती, वाडे, घरांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणे बंधनकारक करण्यात आले.
dangerous buildings
dangerous buildingsesakal

Nashik News : शहरातील जुन्या इमारती ढासळण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारती, वाडे, घरांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणे बंधनकारक करण्यात आले. परंतु दरवर्षी कायदेशीर कारवाईतून सुटका करून घेण्यासाठीच सोपस्कार पार पाडले जात असल्याचे पुन्हा एकदा मागील आठवड्यातील दोन घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

मागील आठवड्यात विठ्ठल पार्कमधील जीर्ण झालेल्या इमारतींच्या दोन बाल्कनी कोसळल्या, तर पंचवटी विभागातील पेठ रोड, फुलेनगर, गौडवाडीतील घरकुल योजनेचे स्लॅब कोसळण्याचे प्रकार घडले. यावरून शहरात जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नियमानुसार शहरातील जुन्या इमारती ढासळण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारती.

वाडे, घरांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्यास २५ हजार रुपये दंड किंवा मालमत्ता कराएवढी रक्कम मिळकत धारकाला दंडात्मक स्वरूपात द्यावी लागते.

परंतु जीर्ण झालेल्या इमारतींवर महापालिकेने कुठलीच कारवाई केली नाही किंवा जीर्ण झालेल्या इमारतींच्या मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाकडे कुठल्याच प्रकारचा डेटा उपलब्ध नाही. जीर्ण झालेल्या इमारतींनादेखील नोटीस पाठविण्यात आलेली नाही. महापालिकेकडे कारवाईसाठी यंत्रणा उपलब्ध नाही. (latest marathi news)

dangerous buildings
Nashik ZP News : जिल्हा परिषदेचा 46 टक्के निधी खर्च! निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान

एक हजारांहून अधिक धोकादायक इमारती, वाडे

शहरात एक हजारांहून अधिक धोकादायक इमारती व वाडे आहेत. बहुतांश वाडे जुने नाशिक व पंचवटी भागात आहेत. वाडे ढासळण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सहा विभागीय कार्यालयांमार्फत धोकादायक वाडे खाली करण्याच्या सूचना दिल्या जातात.

परंतु एकदा नोटीस बजावल्यानंतर त्याकडे फारसे महापालिका किंवा त्या जागेत राहणारे भाडेकरू, मालक लक्ष देत नाही. एखादी दुर्घटना घडल्यास महापालिकेचे अधिकारी नोटीस बजावल्याचे कारण देवून हात वर करतात. आर्थिक नुकसान किंवा जागेवरचा दावा जाईल म्हणून तेथे राहणारे घर सोडत नाही.

परंतु महापालिकेने आता वाड्यासंदर्भात ठोस धोरण स्वीकारले आहे. तीस वर्ष पूर्ण झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करून ती जागा राहण्यायोग्य आहे की नाही याबाबत प्रमाणपत्र घ्यावे. त्यानंतरच निर्णय घ्यावा. राहण्यायोग्य घर नसल्यास त्या जागेत वास्तव्य करू नये किंवा नवीन इमारत बांधावी अशा स्पष्ट सूचना आहेत. परंतु याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. दुर्घटना घडल्यानंतरच विषय चर्चेला येतो.

dangerous buildings
Nashik Agriculture News : क्रॉपकव्हरद्वारे वाढलेल्या रेडग्लोब द्राक्षबागेला प्रधान सचिवांनी भेट

येथे होईल स्ट्रक्चरल ऑडिट

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेज, सिव्हिल टेक, संदीप पॉलिटेक्निक या संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करता येणार आहे.

विभाग धोकादायक घरे, वाडे

पश्चिम ६००

पंचवटी १९८

पूर्व ११७

नाशिक रोड ६९

सातपूर ६८

सिडको २५

---------------------------

एकूण १०७७

----------------------------

dangerous buildings
Nashik News : पर्यटनस्थळ सुरक्षिततेसाठी सर्वांनी एकत्र यावे : श्रीकृष्ण देशपांडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com