Nashik ZP News: दिव्यांग पडताळणीकडे जि. प. कर्मचाऱ्यांची पाठ! नोटिसा बजावूनही 187 कर्मचाऱ्यांनी काढले नाही UDID क्रमांक

Nashik News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे.
Nashik ZP News
Nashik ZP Newsesakal

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. पडताळणीसाठी सामान्य प्रशासन विभागाने दिलेली डेटलाइनही उलटून गेली आहे. तरीदेखील १८७ कर्मचाऱ्यांनी दिव्यांग पडताळणी (यूडीआयडी क्रमांक) केलेली नाही. यावर सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी (ता. ३०) पुन्हा आढावा बैठक बोलावली आहे. (Nashik ZP Disability Verification negligence by employees marathi news)

जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग प्रमाणपत्राच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय मित्तल यांनी घेतला. त्यानुसार सर्व विभागांना पत्र काढून कार्यवाहीचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला विभागांनी केराची टोपली दाखविली होती.

त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी पत्र काढत प्रमाणपत्र पडताळणीचे निर्देश दिले होते. याच पार्श्वभूमीवर मित्तल यांनी आढावा बैठक घेतली असता यातही अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केलेली नसल्याचे निदर्शनास आले. मुख्यालयासह पंचायत समितीतील एकूण १८ हजार ६६८ मंजूर पदांपैकी १५ हजार ११३ पदे भरलेली आहेत.

यातील ६०९ कर्मचाऱ्यांकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे. प्रशासनाच्या आदेशानंतर यातील ४११ कर्मचाऱ्यांनी पडताळणी करत, यूडीआयडी क्रमांक काढला आहे, तर १९८ कर्मचाऱ्यांनी हा क्रमांक काढला नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर परदेशी यांनी या कर्मचार्यांना १९ एप्रिलची डेटलाइन दिली होती. (Latest Marathi News)

Nashik ZP News
Nashik Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, भास्कर भगरेंसह 5 अर्ज दाखल

ही डेटलाइनही उलटून गेली. तरी, कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली नव्हती. त्यावर आक्रमक झालेल्या सामान्य प्रशासन विभागाने पडताळणी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजाविल्या. या नोटिसा प्राप्त झाल्यानंतर तत्काळ पडताळणी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. परदेशी यांनी सोमवारी (ता. २९) पुन्हा आढावा घेतला असता शिल्लक असलेल्या १९८ पैकी ११ कर्मचाऱ्यांनी पडताळणी केल्याचे दिसून आले.

त्यामुळे १८७ कर्मचाऱ्यांची अद्यापही पडताळणी झालेली नाही. यात सर्वाधिक १४४ शिक्षकांचा समावेश आहे. वारंवार आदेश देऊनही पडताळणी होत नसल्याने परदेशी यांनी मंगळवारी न काढलेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागवत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

Nashik ZP News
Nashik Lok Sabha Election 2024: राजाभाऊ वाजे 14 कोटी 80 लाखांचे धनी! 2019 च्या विधानसभेच्या तुलनेत जंगम मालमत्तेत दुपटीने वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com