Nashik Numerology Scam Ashok Kharat Arrested
esakal
नाशिक : अंकज्योतिषाच्या आडून ‘भविष्य बदलण्याचे’ आमिष दाखवत उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या ‘कॅप्टन’ खरातचा घाणेरडा चेहरा अखेर समोर आला आहे. महिलांच्या वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा घेत ‘विधी’च्या नावाखाली लैंगिक अत्याचार करणाऱ्या या ‘हायप्रोफाइल’ भोंदू अशोक खरातला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. १८) पहाटे गोविंदनगर परिसरातील त्याच्या बंगल्यात बेड्या (Ashok Kharat arrest news Nashik) ठोकल्या.