नाशिक : नागरिकांच्या खिशातील एक कोटीच्या निधीचा चुराडा

Nashik-Municipal
Nashik-Municipal Sakal
Updated on

नाशिक रोड : जेल रोड के. एन. केला शाळेशेजारील दोन वर्षांपूर्वी बांधलेले भाजी मार्केट सध्या वापराविना असून, एक कोटी दहा लाख रुपये निधीचा चुराडा झाल्याची बाब लोकांच्या निदर्शनास येत आहे. शाळेच्या कंपाउंडसाठी बांधकाम विभागाच्या अधिकारी व एका ज्येष्ठ नगरसेवकाने महापालिकेचा करोडो रुपयांचा निधीचा चुराडा केल्याची बाब सामान्य नाशिककर बोलत आहेत.

जेल रोड येथे सध्या प्रेस गेट समोरील रस्त्यावरच भाजीबाजार बसत आहे. टाकीपासून तर थेट फिलोमिना शाळेपर्यंत हा भाजीबाजार असतो. दोन वर्षांपूर्वी प्रभाग २० मधील भाजीबाजार बांधण्यात आला. यासाठी केला शाळेच्या शेजारील ग्राउंडमध्ये भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे करण्यात आले. शिवाय या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात आली. या कंपाऊंडचा फायदा शाळेला झाला. नाशिक महापालिकेतील बांधकाम विभागातील अधिकारी नीलेश साळी हे गेल्या अनेक वर्षापासून केला शाळेचे ट्रस्टी आहेत. भाजी बाजारासाठी उभे केलेले हे कंपाउंड शाळेसाठी उभे केल्याचे बोलले जात आहे. एखाद्या ठिकाणी सामाईक भिंत बांधल्यावर त्याचा ५० टक्के फायदा दोन्ही बाजूला होत असतो.NASHIK: One crore rupees was squandered in the pockets of citizens

Nashik-Municipal
फेसबुकला आता 'या' नावाने ओळखले जाणार

तसाच फायदा शाळेला झाला आहे. भाजीबाजार भूमिपूजन होण्याआधी अनेकांनी या कामाला विरोध केला होता. म्हणून दोन वर्षापासून या ठिकाणी भाजी बाजार बसत नसल्यामुळे एक कोटी दहा लाखाचा निधी वाया गेल्याचे लक्षात येत आहे.

"माझे वडील या शाळेचे विश्वस्त होते. त्यानंतर अभियंता म्हणून मला या ठिकाणी विश्वस्तपद देण्यात आले. योगायोगाने याठिकाणी काम करण्यात आले म्हणून काही लोक सोयीचा अर्थ काढत आहे. शाळेला कंपाउंड बांधण्याचा आमचा उद्देश नव्हता. याठिकाणी शौचालयाची सोय येत्या काही दिवसात निर्माण करून देणार आहोत."

- नीलेश साळी, बांधकाम अभियंता, नाशिक रोड

"सामान्य नाशिककरांच्या खिशातले पैसे खर्चून येथे भाजी मार्केट उभारले, मात्र त्याचा आजपर्यंत काहीच उपयोग झाला नाही. येथे ग्राहक येणार नाही शिवाय शौचालयाची सोय उपलब्ध नाही. पाण्याचा अभाव आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी एका लोकप्रतिनिधी व अभियंत्याने केलेली करामत आहे."

- शशिकांत उन्हवणे, भाजी विक्रेता संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com