Nashik News : मालेगावात 500 कोटीचे व्यवहार ठप्प! बाजार समितीचे 50 लाखांचे नुकसान

Nashik News : विविध सण-उत्सव, मार्च एंड, तसेच व्यापारी व माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांमुळे बाजारातील उलाढालीला ब्रेक लागला आहे.
Malegaon market committee
Malegaon market committeeesakal

मालेगाव : व्यापारी व माथाडी कामगारांमधील लेव्हीच्या वादामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत. २१ एप्रिलचा अपवाद वगळता महिन्यापासून कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद असल्याने मालेगाव बाजार समितीतील जवळपास पाचशे कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. परिणामी, बाजार समितीचे देखील ५० लाख रुपयाचे उत्पन्न बुडाले आहे. बाजार बंदमुळे सर्वच घटकांना याचा फटका बसला आहे. (Nashik onion auction close 500 crores transactions sto in Malegaon)

विविध सण-उत्सव, मार्च एंड, तसेच व्यापारी व माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांमुळे बाजारातील उलाढालीला ब्रेक लागला आहे. येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात गहू, बाजरी, मका आदींसह कडधान्य व भुसार मालाचा लिलाव होतो.

एप्रिल-मे या दोन महिन्यात येथे गव्हाची लक्षणीय विक्री होते. अनेक व्यापारी मध्यप्रदेशमधून गहू मागवून तो येथे विकतात. लिलाव बंद असल्याने बाजार समितीतील व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा फटका समिती परिसरातील हॉटेल, उपहारगृह व इतर व्यावसायिकांना देखील बसला आहे.

येथील बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात मोठ्या प्रमाणावर कांद्याची खरेदी-विक्री होते. रोज सरासरी १५ ते २० हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येतो. सध्या उन्हाळी कांद्याचा हंगाम आहे. त्यामुळे ही आवक २५ हजार क्विंटलपर्यंत वाढणे अपेक्षित होते. शिवाय बाजार समितीच्या सौंदाणे, झोडगे व निमगाव या उपबाजारातही कांद्याचे लिलाव होतात. (Latest Marathi News)

Malegaon market committee
Nashik Onion Auction: कपातीशिवाय कांदा लिलाव सुरू! सटाणा, नामपूर, देवळा, मालेगाव, सिन्नर, पिंपळगावला बाजार समितीत विक्रमी आवक

एकूणच महिन्यापासून बाजार बंद असल्याने ५०० कोटीपेक्षा अधिक रक्कमेची उलाढाल मंदावली. बाजार समितीला एक टक्का बाजार फी मिळते. परिणामी, समितीचे देखील ५० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. याशिवाय कांदा व इतर भुसार माल ने-आण करणाऱ्या शेकडो वाहनचालक बेरोजगार झाले आहेत. उपबाजारावर अवलंबून असणारे इतर व्यवसायही कोलमडले आहेत. बाजार पुर्ववत सुरु होणे हे शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार, बाजार समिती व इतर सर्व घटकांच्या हिताचे ठरणार आहे. त्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे.

Malegaon market committee
Nashik Onion Auction: महिन्यात 3 लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प! निर्यातीसोबत कांदा लिलाव बंद ठरले दुष्काळात तेरावा महिना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com