Nashik Onion Crisis: कांदा निर्यात बंदी निर्णय विरोधात सिन्नरला रस्ता रोको

Nashik Onion Crisis sinnar block road against onion export ban decision
Nashik Onion Crisis sinnar block road against onion export ban decisionesakal

सिन्नर : केंद्र सरकारने शुक्रवारी कांदा निर्यात बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याच दिवशी चार ते पाच हजार रुपयांपर्यंत विकला जाणारा कांदा एक हजारांच्या आसपास खाली उतरेल, अशी भीती असल्यामुळे सिन्नर येथील बाजार समिती कांदा विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी संतप्त होत सिन्नर येथील रस्ता रोको केला. (Nashik Onion Crisis sinnar block road against onion export ban decision)

दुपारी बारा ते अडीच वाजे दरम्यान शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने शिर्डी व निफाड बाजूकडून येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

कांद्याला कधी नव्हे तो अपेक्षित भाव मिळत असताना अचानक सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लादत नुकसानीच्या खाईत लोटल्याचा आरोप संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला. गुरुवारपर्यंत चार ते पाच हजार रुपये दरम्यान कांद्याला भाव मिळत होते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा अपेक्षित किमतीत विकला जाईल या अपेक्षेने बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणायला सुरुवात केली होती. मात्र केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदीचे निर्णय घोषित केल्यानंतर त्याचा थेट परिणाम कांद्याचे भाव घसरण्यावर झाला.

एक हजार रुपये देखील कांद्याला भाव मिळेल की नाही ही भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ शहरी लोकांच्या फायद्यासाठी कांदा परदेशात निर्यात होऊ नये यासाठी पुढाकार घेतला.

मात्र, शेतात काबाडकष्ट करणाऱ्या व नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. सरकारच्या आदेशानुसार 31मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

कांदा निर्यात बंदीचा हा निर्णय समजल्यावर सिन्नर येथील बाजार समिती कांदा विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला सिन्नर बाजार समिती समोरील व विवेक चौकात कांद्याने भरलेली वाहने रस्त्यावर उभी करून वाहतूक वाढवण्यात आली त्यामुळे शिर्डीहून तसेच निफाड बाजूने येणारी वाहतूक ठप्प झाली होती.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची माहिती मिळताच सिन्नरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. मात्र संतप्त झालेले शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांची घोषणाबाजी सुरू होती.

पोलिसांनी सिन्नर बस स्थानकावरून शिर्डी व निफाड कडे जाण्यासाठी वावी वेसकडे येणारी वाहतूक संगमनेर नाक्यावरून वळवली. शिर्डी कडे जाणाऱ्या वाहनांना मुसळगाव बायपासने जाण्याची सूचना करण्यात आली होती. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठत तहसीलदारांना निवेदन दिले.

Nashik Onion Crisis sinnar block road against onion export ban decision
Nashik Onion Crisis: कांद्याचे दर गडगडल्याने वणी येथे संतप्त शेतकऱ्यांचा रस्तारोको

एक हजार रुपयांनी लाल कांदा कोसळला...

शेतकऱ्यांच्या रस्ता रोको मुळे तीन वाजेनंतर कांद्याचे लिलाव सुरू झाले. कांदा निर्यात बंदीचा फटका पहिल्याच दिवशी बसला. गुरुवारपर्यंत सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल असणारा कांदा एक हजार रुपये क्विंटल ने घसरून 2500 रुपयांना विकला गेला.

उन्हाळ कांद्याच्या भावात मात्र फारशी घट झाली नाही. भाव पडल्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी कांदा विक्री न करताच घराकडे माघारी नेला. सिन्नर बाजार समितीत केवळ एक हजार क्विंटल कांद्याची आवक राहिली.

"या अगोदर सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य वाढवून शेतकऱ्याचे कंबरडे मोडले होते. तर आता सरसकट निर्यात बंदी लादून देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या किमती घसरवण्याची खेळी खेळली आहे. अतिवृष्टी, दुष्काळ या परिस्थितीचा सामना शेतकरी सातत्याने करत आहेत. त्यात चुकीच्या सरकारी धोरणामुळे शेती पिकवायची कशी असा प्रश्न उभा राहिला आहे."

- हरिभाऊ तांबे ( कामगार नेते)

रविवारी निषेध मेळावा...

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी धोरणाचा निषेध करण्यासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता सिन्नर येथे बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन हरिभाऊ तांबे यांनी केले आहे.

Nashik Onion Crisis sinnar block road against onion export ban decision
Nashik: 2 मंडळाधिकारी, 27 तलाठी कार्यालयांसाठी 4 कोटी! पिंपळस-येवला रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 560 कोटींचा निधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com