येवला: शासनाने दोन वर्षांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले होते, मात्र तांत्रिक अडचणीत अडकलेल्या जिल्ह्यातील सुमारे दहा हजारांवर शेतकऱ्यांचे अनुदान दोन वर्षांपासून रखडून होते. दोन वर्षांनंतर अखेर अनुदान देण्यासाठी शासनाला मुहूर्त मिळाला आहे. फेरछाननी अंतर्गत जिल्ह्यातील नऊ हजार ९९८ शेतकऱ्यांसाठी १८ कोटी ५८ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. अनुदान मिळण्याची अपेक्षा सोडलेल्या शेतकऱ्यांना एक प्रकारे ही लॉटरीच समजली जाते.