Farmer Protest
Farmer Protest sakal

Agricultural News : शेतकऱ्यांचा संताप उसळला; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदा-भाकरी खाऊन आंदोलन

Farmer Protest Intensifies in Nashik Over Onion Price Crisis : शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदा-भाकरी खाऊन शासनाच्या धोरणांचा निषेध केला; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
Published on

नाशिक: ‘नाफेड’द्वारे होणारी कांदा खरेदी कायमस्वरूपी बंद करावी, कांद्याला उत्पादन खर्चावर भाव मिळावा, शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून, मंगळवारी (ता.२९) त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदा-भाकरी खाऊन आंदोलन केले. निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्या दालनात ठिय्या मांडला. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पोलिस व महसूल यंत्रणेची धावपळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com