Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रात कांदा, लिंबू अन् मोबाईल बंदी! निवडणूक आयोगाने घेतली धास्ती

Lok Sabha Election : नाशिक व दिंडोरीत मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना कांदा, लिंबू, मोबाईल, डिजिटल घड्याळ अशा वस्तूंसह मतदान केंद्रात प्रवेशबंदी केली आहे.
Onion lemon and mobile phone ban in polling station
Onion lemon and mobile phone ban in polling stationesakal

Nashik News : ईव्हीएम मशिनवर कांदा ठेवून मतदान केल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. नाशिक व दिंडोरीत मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना कांदा, लिंबू, मोबाईल, डिजिटल घड्याळ अशा वस्तूंसह मतदान केंद्रात प्रवेशबंदी केली आहे. तरीही कुणी प्रवेश केल्यास त्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Nashik Onion lemon and mobile phone ban in polling station)

नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी सोमवारी (ता. २०) जिल्ह्यातील चार हजार आठशे मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, जास्तीत जास्त मतदारांनी हक्क बजावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु हक्क बजावताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

काही वात्रट मतदार जाणीवपूर्वक कांदा, द्राक्ष, टोमॅटो, मोबाईल फोन मतदान केंद्रात घेऊन जातात आणि आपण कुणाला मतदान केले, हे उघड करतात. त्यामुळे इतर मतदारांवर त्याचा प्रभाव पडतो व आचारसंहितेचे उल्लंघन होते. अशा मतदारांना ‘लगाम’ लावण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी डिजिटल वस्तूंसह कांदा.

द्राक्ष, टोमॅटो अशा वस्तूही खिशात घेऊन जाण्यास मज्जाव केला आहे. मोबाईल फोन ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. परंतु मतदाराने स्वत:च्या जबाबदारीवरच मोबाईल त्यांच्याकडे द्यावा. त्याविषयी कुठलीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. (latest marahi news)

Onion lemon and mobile phone ban in polling station
Nashik News : इगतपुरीच्या रानमेव्याला ऐन हंगामात ‘बुरे दिन’! वळिवाचा परिणाम

...म्हणून घेतला निर्णय

कांदा प्रश्‍न नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यापूर्वी झालेल्या मतदानाच्या ठिकाणी काही मतदारांनी कांद्याचा फोटो ठेवून मतदान केले. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आणि हा ट्रेंड पुढे जाऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने नियम अधिक कडक केले आहेत.

"मतदान करताना आचारसंहितेचा भंग होईल, अशी कुठलीही कृती मतदारांनी करू नये. मोबाईल शक्यतो मतदान केंद्रापर्यंत घेऊन येऊ नये. आणल्यास केंद्रावर मोबाईल जमा करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या जबाबदारीवर मोबाईल ठेवावा. डिजिटल स्वरूपातील किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या गोष्टींना बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनी नियमांचे पालन करून आपला हक्क बजवावा." - बाबासाहेब पारधे, निवडणूक निर्णय अधिकारी, दिंडोरी

Onion lemon and mobile phone ban in polling station
Nashik Onion News : कांदा दरवाढ नसल्याने आवक घटली; शेतकरी, व्यापारीही नाराज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com