Nashik News : इगतपुरीच्या रानमेव्याला ऐन हंगामात ‘बुरे दिन’! वळिवाचा परिणाम

Nashik : आरोग्य व गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेमुळे यंदा ऐन उन्हाळ्यात येणाऱ्या गावठी रानमेव्याला ‘बुरे दिन’ आले आहेत.
In the second photo, a lovely picture of the new Karvanda, which is coming in this season, is the Kaira, which has blossomed in various parts of the taluka.
In the second photo, a lovely picture of the new Karvanda, which is coming in this season, is the Kaira, which has blossomed in various parts of the taluka.esakal

Nashik News : निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पावसाचा शिडकावा, वातावरणातील असमतोलपणा आणि त्यात सततच्या ढगाळ वातावरणामळे झाडांचे बिघडलेले आरोग्य व गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेमुळे यंदा ऐन उन्हाळ्यात येणाऱ्या गावठी रानमेव्याला ‘बुरे दिन’ आले आहेत. ढगाळ वातावरणामुळे गावरान आंबा, जाभुंळ व करवंदासह आवळ्याच्या कोवळ्या फळांना फटका बसल्यामुळे रानमेव्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ( fruits of amla along with mango jamun and karonda are affected due to cloudy weather )

दरम्यान, राज्याच्या कृषी नकाशावर फळ आणि रानमेव्याचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, अलिकडच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या पिकांसह फळा-फुलांना लहरी वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे वेळापत्रक पुर्णत: कोलमडले तर आहेच; शिवाय आता गावरान रानमेव्या बाबतही तेच घडत असल्यामुळे काही भागात आर्थिक संकट उदभवणार आहे.

इगतपुरी तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यातच कसारा घाटाचे विस्तीर्ण जंगल यामुळे या भागात शेंद्रया, दौडी साखऱ्या, पिठल्या, भोपळ्या, कलम्या व गावरान आंब्याच्या जातीसह जांभूळ, करवंद व गावठी आवळ्याची झाडे आहेत. दरवर्षी भरभरून उत्पन्न देणाऱ्या भागात मात्र नैसर्गिक असमतोलामुळे भरभरून आलेला मोहोर या वातावरणाच्या कचाट्यात सापडून जळाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (latest marathi news)

In the second photo, a lovely picture of the new Karvanda, which is coming in this season, is the Kaira, which has blossomed in various parts of the taluka.
Nashik News : मेंढपाळ तरुणाची उद्योग व्यवसायात भरारी! नगरसुलच्या बाबूराव वऱ्हेंनी उभारला गव्हाणी निर्मितीचा उद्योग

आदिवासी मुकणार हक्काच्या कमाईला

गावठी रानमेवा आणि आदिवासींचे वेगळे असे आर्थिक नाते आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात रानमेवा उपलब्ध होईल तेवढ्या प्रमाणात आदिवासी व डोंगरदऱ्यात वास्तव्य करणाऱ्यांना आर्थिक हातभार मिळत असतो. उन्हाळ्यात येणाऱ्या रानमेव्याच्या (गावरान आंबा, करवंद, जांभूळ, शेंद्रया, गावठी आवळा) विक्रीतून प्रपंच भागवून येणाऱ्या हंगामाच्या तयारीसाठी हेच दोन पैसे आवरून ठेवत नियोजन केले जाते. मात्र, यंदा उत्पन्नच घटणार असल्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार आहे.

''यंदाच्या हंगामात येथील जंगलात करवंद, जांभळाच्या झाडांना व गावरान आंब्यांना चांगला मोहोर आणि बहार आला आहे. मात्र, ऐन फळ वाढीच्या काळात वेळोवेळी पडणारा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व उष्णतेचा तडाखा बसत असल्यामुळे बहार झटकला जात आहे. त्यामुळे यंदा दोन पैसे कमीच मिळतील, याची आतापासूनच शंका येऊ राहिली आहे.''- अंजनाबाई खडके, आदिवासी महिला, चिंचलेखैरे

In the second photo, a lovely picture of the new Karvanda, which is coming in this season, is the Kaira, which has blossomed in various parts of the taluka.
Nashik News : महापालिकेसह स्मार्टसिटी कंपनी, जिल्हाधिकाऱ्यांना अवमान नोटीस!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com