Nashik Onion Rates Hike: नामपूरला कांदा @4000! मागणी वाढत असल्याने प्रथमच उच्चांक

Record arrival of onion in market committee at Nampur
Onion News
Onion Newsesakal

Nashik Onion Rates Hike : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात सोमवारी (ता.२३) १ हजार ५७८ वाहनांमधून विक्रमी सुमारे २८ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.

कांद्याने पहिल्यांदा चार हजारांचा टप्पा पार केला असून गेल्या आठवड्यापेक्षा कांद्याच्या भावात सरासरी ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली.

उन्हाळ कांद्याला ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल असा सर्वोच्च, ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विटंल असा सरासरी भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब अहिरे, उपसभापती भाऊसाहेब कांदळकर यांनी दिली. (Nashik Onion Rates Hike Onion at Nampur 4000 rs cross First time high as demand increases)

दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी (ता.२३) येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली. यंदा मोसम खोऱ्यासह बागलाण तालुक्यात पावसाची अवकृपा असल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असला तरी कांद्याच्या तेजीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

यंदा पावसाअभावी लाल कांद्याची आवक सुमारे एक महिना उशिराने होणार असल्याने कांद्याचे दर टिकून राहतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

अनेक कारणांमुळे एप्रिल महिन्यापासूनच साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने मिळेल त्या भावात कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता.

सध्याच्या भाववाढीचा ठरावीक शेतकऱ्यांनाच फायदा मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांमुळे अनेक दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या बंद होत्या.

त्यामुळे सप्टेंबरमध्ये बाजार समित्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार ठप्पच होते. गेल्या पंधरवाड्यापासून येथील बाजार समिती, करंजाड उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक होत आहे.

कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकरी दैनंदिन कांदा विक्रीचे नियोजन करत असल्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कांद्याने भरलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे नळकस रस्त्यालगत वाहतूक विस्कळीत झाली होती.

Onion News
Onion Rates Hike: विजयादशमीच्या पूर्वसंध्येला उन्हाळी कांदा भावाचे सीमोल्लंघन! क्विंटलला 551 ते 750 रुपयांची वृद्धी

परिसरातून येथील बाजार समितीत, करंजाड उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. सकाळी दहाला लिलावाला सुरुवात झाली. नामपूरला १०३६ वाहने तर करंजाडला ५४२ वाहनांचे लिलाव करण्यात आले.

शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे, शेतकऱ्यांनी वाहन पार्किंग करताना बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे.

नामपूरचे भाव व वाहने

- ४०००/४५००₹ : १६३

- ३५००/४०००₹ : ४५६

- ३०००/३५००₹ : ४५

- २५००/३०००₹ : २८

- २०००/२५००₹ : ७१

- १०००/२०००₹ : ६८

- २२०/१०००₹ : २०५

Onion News
Onion Subsidy News : कांदा अनुदानापासून 619 शेतकरी वंचित; पडताळणीअंती ठरविले अपात्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com