

नाशिक : महापालिकेतर्फे गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ५५ कोटी रुपयांच्या भूसंपादन प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्याच्या नगरविकास विभागाने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भूसंपादन प्रकरणे मार्गी लावणाऱ्या दलालांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पत्रावरून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नगरविकास विभागाचे कार्यसन अधिकारी मो. क. बागवान यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना पत्र पाठवून तशा सूचना दिल्या आहेत.