Nashik News : शवपेटी मृत्युशय्येवर तर स्मशानभुमी धुळीत! अखेरचा प्रवास समस्यांच्या गर्तेतूनच

Nashik News : लोकवर्गणीतून ओझरकरांनी तत्कालीन ग्रामपालिकेस दिलेली शवपेटी गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने ती नगरपरिषदेच्या पार्किंग मध्ये धूळखात पडली आहे
Coffin lying in disrepair in municipal parking lot
Coffin lying in disrepair in municipal parking lotesakal

ओझर : लोकवर्गणीतून ओझरकरांनी तत्कालीन ग्रामपालिकेस दिलेली शवपेटी गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने ती नगरपरिषदेच्या पार्किंग मध्ये धूळखात पडली आहे. मारुती मंदिरामागील स्मशानभूमीत अंत्यविधी शेड मध्ये धुळीचे साम्राज्य असल्याने नागरिकांची बसण्याची मोठीच गैरसोय होत आहे. (Nashik ozar municipal council negligence)

ओझर ग्रामपालिकेचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर ओझर ग्रामस्थांच्या समस्या कमी झालेल्या नाहीत. वाढते शहरीकरण लक्षात घेता नागरीकांनी तत्कालीन ग्रामपालिकेस लोकवर्गणीतून शवपेटी दिली. निधनानंतर नातेवाइकांना येण्यास उशीर होत असल्याने शब्बीर खाटीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करीत विजेवर चालणारी शवपेटी तत्कालीन ग्रामपालिकेस दिली होती. किमान बारा तास मृतदेह चांगल्या अवस्थेत या शवपेटीत होता काही महिन्यापूर्वी ही शवपेटी नादुरुस्त झाली आहे.

शवपेटीबाबत शब्बीर खाटीक व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपरिषदेला दोन ते तीन निवेदन देत दुरुस्तीची मागणी केली. परंतु सरकारी काम आणि सहा महिने थांब या उक्तीनुसार या निवेदनाला नगरपरिषदेने केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शवपेटीची गरज भासल्यास पिंपळगाव बसवंत येथील एका सामाजिक संस्थेची शवपेटी आणावी लागते.

एच.ए.एल आणि तत्कालीन आमदार अनिल कदम यांनी स्थानिक विकास निधीतून साकारलेल्या स्मशानभूमीची देखील धुळधाण झाली असून अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरीकांनी बसण्यासाठी उभारलेल्या शेड मध्ये धुळीचे मोठे साम्राज्य असल्याने नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे.  (latest marathi news)

Coffin lying in disrepair in municipal parking lot
Raigad Lok Sabha : कट्टर मुस्लीम शिवसैनिकांचं गाव! रायगडचं राजकारण 'या' गावातूनच चालतं...

बिनपाण्याचे सात नळ

स्मशानभूमीत एकूण सात आठ नळ आहे लोकवर्गणीतूनच पाण्याची टाकी देखील आहे. परंतु ना टाकीत पाणी ना नळाला पाणी अंत्यसंस्कारासाठी नागरीकांना मारुती मंदिरातून पाणी आणावे लागते येथे असलेली पाण्याची टाकी आणि नळ फक्त शोभेच्या वस्तु झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

"लोकवर्गणीतून दिलेली शवपेटी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेली आहे या बाबत नगरपरिषदेस दोन तीन वेळा निवेदन दिले परंतु याची दखल घेतली गेली नाही नगरपरिषदेने त्याची त्वरित दखल घ्यावी." - शब्बीर खाटीक (सामाजिक कार्यकर्ते)

"शवपेटी बाबत माहिती घेउन लवकरच कार्यवाही केली जाईल. स्मशानभूमीची रोज साफसफाई केली जाते परंतु काही उणिवा असतील तर त्या निश्चित दूर केल्या जातील."

- प्रतीक उंबरे (स्वच्छता निरीक्षक)

Coffin lying in disrepair in municipal parking lot
Nashik NMC News : महापालिकेचे प्रकल्प डोईजड! पलुस्कर, भोरे नाट्यगृहासह जलतरण तलावाचे खासगीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com