Raigad Lok Sabha : कट्टर मुस्लीम शिवसैनिकांचं गाव! रायगडचं राजकारण 'या' गावातूनच चालतं...

मोरबासह श्रीवर्धन, महाड, अलिबाग, मुरुडमधील मुस्लीम समुदायातील लोकांना तटकरेंचा पराभव करायचा आहे.
Raigad Lok Sabha
Raigad Lok Sabhaesakal
Summary

मोरबा येथील मतदार बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मानतो. रायगडमध्ये शिंदे गटाचं अस्तित्व देखील नाही, असं येथील मतदारांनी बोलून दाखवलंय.

Raigad Lok Sabha : माणगावला लागून श्रीवर्धन रोडलगत मोरबा हे गाव (Morba Raigad) आहे. या गावात ८० टक्के मुस्लीम लोक राहतात. हे सर्वजण मराठी साक्षर आहेत. शरद पवार आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी नुकतीच मोरबा इथं सभा घेतली. २०१९ मध्ये तटकरे निवडून आले, कारण त्यांना मुस्लीम समुदायाची मोठी मदत मिळाली होती, असा राजकीय अंदाज व्यक्त करण्यात येतो.

त्यामुळं मोरबा गावातील काही मतदारांशी, राजकीय नेत्यांशी 'सकाळ'च्या प्रतिनिधीने संवाद साधला असता माणगावमधील मुस्लीम समूदाय (Muslim Community) शिवसेनेच्या बाजूने असल्याचे स्पष्टपणे दिसते.

Raigad Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : शाहू महाराजांविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे बंडखोर नेते बाजीराव खाडे 6 वर्षांसाठी निलंबित

अनंत गिते (Anant Geete) यांचं हक्काचं गाव म्हणजे मोरबा.. येथील मतदार बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मानतो. रायगडमध्ये शिंदे गटाचं अस्तित्व देखील नाही, असं येथील मतदारांनी बोलून दाखवलंय. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत मुस्लीम मते गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

मोरबासह श्रीवर्धन, महाड, अलिबाग, मुरुडमधील मुस्लीम समुदायातील लोकांना तटकरेंचा पराभव करायचा आहे. त्यामुळे ते मविआच्या सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावताहेत. भाजपबाबत प्रत्येकाच्या मनात व्देष निर्माण झाला असून मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे. त्यांना संपण्याचा प्रयत्न होतोय. या निवडणुकीत तटकरेंचा पराभव निश्चित आहे. कारण, सर्व समाज एकवटले आहेत. निवडणुकीत अनंत गिते यांचा मोठ्या फरकाने विजय होणार आहे.

-आरिफ मणेर, मोरबा

Raigad Lok Sabha
कोकणाला 'मशाली'ची गरज नाही, राऊतांनी आता राजकारणातून निवृत्ती घेऊन आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा; केसरकरांचा सल्ला

गावातील गटारी, रस्ते बांधून विकास होत नाही. बॅरिस्टर अंतुलेंनी जो या भागाचा विकास केला, तसा विकास आता होताना दिसत नाही. गावात कोणतं रुग्णालय नाही, त्यामुळं एखादा अपघात घडलं तर अलिबागशिवाय आम्हाला पर्याय उरत नाही. अंतुलेंसारखा विकास तटकरे करुच शकत नाहीत. तटकरेंनी आजपर्यंत स्वत:चाच विकास केला, जनतेचा विकास केला नाही. ते बॅरिस्टर अंतुलेंचे होऊ शकले नाहीत, ते शरद पवारांचे कसे काय होतील?

-मोरबा गावातील स्थानिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com