

Nashik
esakal
पंचवटी: पंचवटी परिसरातील पेठ रोडवर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून एका ३६ वर्षीय विवाहित महिलेने तिच्या २६ वर्षीय प्रियकराचा गळा आवळून निघृण खून केल्याची खळबळजनक घटना नवनाथनगर येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी तिन संशयित महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.