Raj Thackeray Nashik Daura : राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पक्ष राज्यस्तरीय मेळावा

Raj Thackeray Nashik Daura : राज ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. ८) सकाळी कुटुंबासह श्री काळाराम मंदिरात आरती केली. आता ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal

Raj Thackeray Nashik Daura : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाचा वर्धापन दिन शनिवारी (ता. ९) साजरा होणार असून, राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका स्पष्ट करतील, अशी अपेक्षा मनसे कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. (Nashik Party state level meeting today in presence of Raj Thackeray)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर पक्षाचा राज्यभर झंझावात निर्माण झाला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तब्बल १२ आमदार निवडून आले, तर राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे व छत्रपती संभाजीनगर या महापालिकांमध्ये नगरसेवकांचे खाते उघडले. २०१२ मध्ये नाशिक महापालिकेत मनसेची अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता आली.

नाशिकमधूनच पक्षाचे तीन आमदार निवडून आले. त्यामुळे मनसेचा नाशिक हा बालेकिल्ला बनला. मात्र भाजपच्या लाटेत सर्व पक्षांना फटका बसला तसा फटका मनसेलाही सहन करावा लागला. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीनंतर आता पुढील दोन महिन्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी नाशिक निवडले आहे.

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. ८) सकाळी कुटुंबासह श्री काळाराम मंदिरात आरती केली. आता ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे. सकाळी साडेनऊला ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.(latest marathi news)

Raj Thackeray
Nashik News : जंगलातील वाॅटरहोलमुळे वन्यप्राण्यांची पाण्याची सोय; टॅंकरद्वारे होतोय पाणीपुरवठा!

निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांचे मेळाव्यानिमित्त होणारे भाषण महत्त्वाचे ठरणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी अशी अपेक्षा आहे, तर विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून निवडणूक लढवावी, अशीही पक्षातील काही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असे मत व्यक्त करणाराही एक वर्ग पक्षात आहे. त्यामुळे ठाकरे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray
Nashik News : शाळा सुटली, मात्र जिविका राहिली वर्गातच; कुलूप तोडून तिला काढले बाहेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com