Nashik News : शाळा सुटली, मात्र जिविका राहिली वर्गातच; कुलूप तोडून तिला काढले बाहेर

Nashik : निफाड तालुक्यातील दावचवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शाळा सुटल्यावरही वर्गातच राहून गेली.
Girl's parents breaking school lock. In the second photograph, the mother is struggling for a living.
Girl's parents breaking school lock. In the second photograph, the mother is struggling for a living.esakal

Nashik News : निफाड तालुक्यातील दावचवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शाळा सुटल्यावरही वर्गातच राहून गेली. पालक व नागरिकांच्या मदतीने वर्गाच्या दाराचे कुलूप तोडून तिला सुखरूप बाहेर काढले. शाळा प्रशासन व शिक्षकांना घरी जाण्याच्या घाईत विद्यार्थ्यांवर किती लक्ष आहे, हे या घटनेवरून दिसून येते. (nashik School ended but student remained in classroom marathi news)

दावचवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीची जीविका अंबादास सुराडकर शाळा सुटल्यावर वर्गात होती. वर्गात कोणी राहिले तर नाही ना, याची खात्री न करता शिक्षकांनी तिला वर्गातच कोंडून वर्ग आणि शाळा बंद केली. शाळा सुटली मात्र जीविका घरी आली नाही. त्यामुळे पालकांनी तिची शोधाशोध सुरू केली.

तिच्या मैत्रिणींना विचारले. मात्र, कुठेही जीविकाचा तपास लागला नाही. जीविका मिळत नसल्याने अखेर कासावीस होत पालकांनी हंबरडाच फोडला. जीविका मिळत नसल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला. शाळेच्या आवारात वर्गाच्या खिडक्यांमधून आवाज दिल्यावर जीविका वर्गातच असल्याचे समजले.

तिला धीर देत तत्काळ वर्गाचे कुलूप तोडून तब्बल दीड तासाने जीविकाला बाहेर काढले अन्‌ आईने पाणावलेल्या डोळ्यांनी तिला घट्ट मिठीत घेतले. जीविकाला बघताच आईवडिलांचा जीव भांड्यात पडला. सरपंच अशोक धुमाळ, डॉ. रामदास कुयटे, गोरख कुयटे, शांताराम शिंदे, बबन कुयटे यांनी वेळीच तत्परता दाखवून जीविकाला पालक अंबादास सुरडकर यांच्या स्वाधीन केले. (latest marathi news)

Girl's parents breaking school lock. In the second photograph, the mother is struggling for a living.
Nashik News : आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचा ‘संपूर्ण’तून सर्वांगीण विकास; 39 शाळांत पथदर्शी प्रकल्‍पातून मार्गदर्शन

दरम्यान, या घटनेची चौकशी केली असता, जीविका मतिमंद असल्याचे मुख्याध्यापिकांनी सांगितले. जीविका मतिमंद आहे, पण खोल्या बंद करणारे मतिमंद तर नाही ना, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

वर्गाचे कुलूप तोडून मुलीला बाहेर काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे शाळेचा गलथान कारभार उघडकीस आला. याची परिसरात चर्चा होत आहे. याबाबत मुख्यध्यापिकांशी संपर्क केला असता, त्यांनी प्रवासात असल्याचे कारण देत माहिती देण्याचे टाळले.

''शाळेत असे प्रकार घडणे, हे मुलांच्या दृष्टीने चुकीचे आहे. या घटनेत शिक्षकांची चूक असल्याने याबाबत कठोर कारवाई केली जाईल.''-डॉ. विजय बागूल, गटशिक्षणाधिकारी

''घडलेला प्रकार निंदनीय आहे. मात्र, आमची मुलगी सुखरूप बाहेर आल्याने आमची शाळा व शिक्षकांविषयी कोणत्याही तक्रार नाही.''-अंबादास सुराडकर

Girl's parents breaking school lock. In the second photograph, the mother is struggling for a living.
Nashik News : प्रधानमंत्री जनमन योजनेंतर्गत 5 मोबाईल मेडिकल युनिट पथके; नागरिकांना मिळणार आरोग्य सुविधा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com