
येवला : डी. फार्मसी म्हणजेच औषधनिर्माण शास्त्र पदविका घेतली की कोणीही कुठेही औषधी विक्री व्यवसाय सुरू करण्यास मोकळे, अशी आतापर्यंतची नियमावली होती. मात्र यात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने पाच वर्षांपासून एक्झिट पात्रता परीक्षेचा गतिरोधक टाकला होता. परंतु वाढत्या तक्रारीमुळे पाच वर्षांनंतर हा निर्णय बदलत फार्मासिस्ट नोंदणीसाठी परवानगी मिळाल्याने पदविकाधारकांना ‘गुड न्यूज’ मिळाली आहे.