नाशिक: जिल्हा परिषद आरोग्य विभागातून निवृत्त होऊन वर्षानुवर्षे झालेल्या महिलांना अद्याप पेन्शन, कालबद्ध पदोन्नती, गटविम्याचा लाभ मिळालेला नाही. या महिलांनी मंगळवारी (ता. १२) पेन्शन अदालतीत हे प्रश्न लावून धरल्याने अखेर आरोग्य विभागाला लेखी आश्वासन द्यावे लागले. येत्या पंधरा दिवसांत या कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे पत्र या विभागाने दिले आहे.