
Nashik PESA Morcha : पेसा भरतीप्रकरणी आदिवासी आयुक्त कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू असतानाच आदिवासी वसतिगृह आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) संघटनेने आयुक्त कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. संघटनेच्या शिष्टमंडळाला प्रशासनाने तत्काळ चर्चेला पाचारण करत, मागण्यांबाबत चर्चा केली. मात्र, प्रशासनाने लेखी देण्यास नकार दिल्याने संघटनेने आयुक्तालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. (PESA Morcha SFI organization sit on tribal commissionerate )