Nashik News : पिनाकेश्‍वर महादेव चैत्रोत्सवावर उन्हाचे सावट; यंदा 2 हजार भाविकांचीच हजेरी

Nashik News : नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून उत्तरेस असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगराच्या शिखरावरील श्री पिनाकेश्‍वर महादेवाच्या चैत्रोत्सवावर यंदा उन्हाचे सावट होते.
Jategaon Shri Pinakeshwar Mahadev Temple here.
Jategaon Shri Pinakeshwar Mahadev Temple here.esakal

बोलठाण : नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून उत्तरेस असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगराच्या शिखरावरील श्री पिनाकेश्‍वर महादेवाच्या चैत्रोत्सवावर यंदा उन्हाचे सावट होते. दरवर्षी २० ते २५ हजार भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असताना यंदा मात्र दोन हजार भाविकांनीच हजेरी लावल्याचे चित्र होते. (Pinakeshwar Mahadev Chaitrotsav is start)

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वरनंतर क्रमांक दोनचे देवस्थान म्हणून श्री पिनाकेश्‍वर महादेव देवस्थानाची ओळख आहे. गुरुवारी (ता. २) याठिकाणी चैत्रोत्सवाला सुरुवात झाली. सायंकाळी प्रथेप्रमाणे मंदिरासमोरील ५१ फुट उंच असलेली दीपमाळ शंकर पवार आणि आप्पा शिंदे यांनी प्रज्वलित करताच ढोल-ताशांच्या गजरात देवाच्या पिंडीवर ठेवलेल्या पितळी मुखवट्यास येथील पवित्र कुंडापर्यंत आणून तेथे स्नान घालून आरती करण्यात आली.

सूर्यास्ताची वेळ असल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सर्व विधी आटोपल्यानंतर हा मुखवटा नवीन लाल कपड्यात पाठीवर घट्ट बांधून अनवाणी पायाने मानकरी शुभम पवार यांनी ७ किलोमीटर अंतर गावच्या वेशीपर्यंत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आणला. तेथून ढोल-ताशांच्या गजरात आतिषबाजी करून ‘श्री पिनाकेश्‍वर भगवान की जय, हर-हर महादेव’च्या जयघोषात गावातील महादेव मंदिरात आणला. (latest marathi news)

Jategaon Shri Pinakeshwar Mahadev Temple here.
Nashik Lok Sabha Constituency : मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणणार प्रचारात रंगत! 12 ला दोंडाईच्यात, तर 16 सटाण्यात सभा

हभप सुभाष मेहतर, बाळू काटे, बाबासाहेब शिंदे, नाना काटे, कडू पाटील, लक्ष्मण वर्पे, नंदु पवार आणि कारभारी बोडखे यांच्या नेतृत्वाखाली भजनाच्या निनादात व विविध प्रकारच्या फुलांनी व रोषणाई केलेल्या देवाच्या पालखी सोहळ्यास रात्री साडेदहा वाजता पालखी मार्गाने सुरुवात झाली. पालखी सजावट करण्यासाठी कैलास तुपे, भागिनाथ सोनार, राजेंद्र जोनवाल, गणेश गवंडर, अनिल शिंदे यांनी परिश्रम घेतले.

प्रवास खर्चही सुटला नाही

शनिवारी (ता. ४) या यात्रेचा समारोप झाला. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भांडे, कपडे, गृहोपयोगी वस्तू, खाद्य पदार्थ, बेंटेक्स ज्वेलरी आदी शेकडो व्यावसायिकांनी ठरलेल्या जागेवर दुकाने थाटली होती. परंतु, उन्हाच्या तडाख्याने दिवसभर खरेदीदारांनी घराबाहेर न पडणे पसंत केल्याने सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत सर्वांची एकच गर्दी होत होती. त्यामुळे तीन दिवस यात्रेसाठी थांबून अपेक्षित धंदा झाला नसल्याची खंत व्यावसायिकांनी बोलून दाखवली. दुरवरुन आलेल्या व्यावसायिकांचे येण्या-जाण्याचे भाडेदेखील निघाले नाही.

Jategaon Shri Pinakeshwar Mahadev Temple here.
Nashik Lok Sabha Constituency : महायुती विरुध्द महाविकास आघाडीत प्रचार युध्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com