
नाशिक : शहरात तीन दिवसांत नायलॉन मांजा वापरून पतंग उडविणाऱ्यांसह ८८ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. नायलॉन मांजामुळे २३ वर्षीय तरुणाचा बळी गेल्याने अज्ञाताविरोधात सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा दाखल झाला आहे. अडीच महिन्यांत या प्रकरणात ११८ संशयितांविरोधात गुन्हे दाखल करीत सुमारे १५ लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.