Police Commissioner Shinde | गुन्हा घडू न देणे ही पोलिसांचीच जबाबदारी : पोलीस आयुक्त शिंदे

Nashik Commissioner of Police ankush shinde
Nashik Commissioner of Police ankush shinde esakal

नाशिक : शहरात कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा घडू नये ही पोलिसांचीच जबाबदारी आहे. गुन्हे रोखण्यासाठी गुन्हेगारांच्या नॉलेजच्या पुढे जाऊन पोलिसांना काम करावे लागणार आहे. कोणत्याही गुन्ह्याची उकल करणे अत्यंत क्लिष्ट असते.

परंतु गुन्ह्याची उकल झाल्यानंतर समाजात जी सकारात्मकता निर्माण होते ती टिकवून ठेवता आली पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले. (nashik Police Commissioner ankush Shinde one half crore worth of goods returned on Raising Day nashik news)

रेझिंग डे निमित्ताने पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात मुद्देमाल परत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयुक्त शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त प्रशांत बच्छाव, पौर्णिमा चौघुले, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी उपस्थित होते.

याप्रसंगी विविध गुन्ह्यातील सुमारे १ कोटी ३६ लाख ७ हजार ४६३ रुपयांचा मुद्देमाल फिर्यांदींना परत करण्यात आला. यात वाहने, मंगळसूत्र, मोबाईल, लॅपटॉप यासह अन्य ऐवजांचा समावेश होता.

गेल्या वर्षभरात दाखल असलेल्या 4 हजार 400 गुन्ह्यांपैकी मालमत्तेविषयक 58 गुन्हे 13 पोलीस ठाण्यांचे पथक तसेच गुन्हेशाखा युनिट १, २ व मध्यवर्ती गुन्हेशाखेने उघडकीस आणले. जवळपास डझनभर संशयित चोरट्यांकडून मंगळसूत्रे, सोन्याचे दागिने, वाहने, कार, दुचाकी व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिसांकडून आतापर्यंत सातवेळेस मुद्देमाल वाटप झाला असून त्यात एकूण ७ कोटी ७७ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. यावेळी सहायक आयुक्तांसह पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखेच्या तीनही युनिटचे प्रमुख व गुन्हा उकल करणारे तपासी अंमलदार उपस्थित होते.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Nashik Commissioner of Police ankush shinde
Nashik Crime News : मालेगावला शालेय फीची रक्कम चोरणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

सौभाग्याचे लेणे परत मिळाल्याने आनंदाश्रू

शहरात सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेलेले महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र त्यांना परत मिळाले. त्यामुळे अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. यावेळी बोलताना अश्‍विनी मोरे, सुनिता लिने यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक करतानाच आभार मानले. त्याचप्रमाणे, महेश रुईकर, विजय लाहोटी, नरेंद्र पवार, सुनंदा कुलकर्णी, स्विटी जैन, सिमा सिंघानिया, किरण पाटील यांनी मनोगत व्यक्त करून पोलीसांचे आभार मानले.

परत केलेला मुद्देमाल

38 लाख 90 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने

25 लाख 70 हजार रुपयांची दुचाकी वाहने

52 लाख रुपयांची चारचाकी व तत्सम वाहने

3 लाख 20 हजारांचे मोबाईल फोन

15 लाख रुपयांच्या अन्य वस्तू व मुद्देमाल

"चैनस्नॅचिंग असो वा चोरी-घरफोडी यामुळे कुटूंबामध्ये तणाव निर्माण होऊन मानसिकता बिघडते. अनेक समस्या यातून निर्माण होतात. पोलीस गुन्ह्याची उकल करतात. परंतु, नागरिकांनीही सजग राहिले पाहिजे. सावधगिरी बाळगली तर चोऱ्या-घरफोड्या वा चैनस्नॅचिंग यासारखे प्रकार टाळता येऊ शकतात. शहर पोलिस दक्ष आहेच. आपणही दक्ष राहिले पाहिजे."

- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त.

Nashik Commissioner of Police ankush shinde
Nashik News : स्वयंपाक गॅसच्या स्फोटात 4 जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com