Nashik : महामार्गावर शून्य अपघातासाठी ‘मूव्हिंग बॅरिकेडिंगं‌’

Nashik Police Commissioner jayant naiknavare Latest News
Nashik Police Commissioner jayant naiknavare Latest Newsesakal

नाशिक : महामार्गावरून भरधाव धावणारी वाहने, वाहनचालकांकडून होणारे लेनचे उल्लंघन यामुळे भीषण स्वरूपाचे अपघात होऊन मोठी प्राणहानी होते. असे अपघात रोखण्यासाठी ते शून्यावर आणण्यासाठी नाशिक शहराचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik Police Commissioner Jayant Naiknavare) यांनी ‘मूव्हिंग बॅरिकेडिंग’ ही अभिनव संकल्पना मांडली आहे.

या संकल्पनेनुसार प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू करीत महामार्गांवर ट्रॅफिक पोलिसिंगचे सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसांत दिसू लागतील, अशी आशा आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी व्यक्त केली आहे. (Nashik police commissioner jayant naiknavare concept about moving barricading Latest Marathi News)

नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतून मुंबई-आग्रा महामार्गासह नाशिक-पुणे, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-सापुतारा हे महामार्ग जातात. साधारणत: यातील मुंबई-आग्रा हा सहापदरी महामार्ग असून, उर्वरित चारपदरी महामार्गांवरून नाशिक शहराच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. वाहतुकीच्या नियमांनुसार रस्त्याची उजवी लेन ही लहान वाहने आणि काहीशा वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी असते.

तर डावीकडील लेन ही अवजड आणि काहीशा धिम्या गतीने जाणाऱ्या वाहनांसाठी असते. असे असले तरी अवजड वाहने ही उजव्या लेनमधून धावतात. त्यामुळे वेगात धावणाऱ्या कार या डाव्या लेनने धावतात. जे वाहतूक नियमांनुसार चुकीचे आहे. यातून अनेकदा रात्रीच्या वेळी अपघात होऊन प्राणहानी होते.

वाहतुकीच्या याच प्रकारावर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी लक्ष केंद्रित करून शहर वाहतूक पोलिस शाखेला रात्रीची पेट्रोलिंग सुरू केली आहे. आयुक्तांच्या या अभिनव संकल्पनेमुळे वाहनचालकांना लेनच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक तर असेलच, शिवाय यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताशी शक्यता कमी होऊन ती शून्यावर आणण्याचा प्रयत्न आहे.

Nashik Police Commissioner jayant naiknavare Latest News
वरुणराजाची धुवांधार ‘बॅटिंग'; हवामान विभागाचा 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा

...अशी आहे ‘मूव्हिंग बॅरिकेडिंग’

शहर वाहतूक पोलिस शाखेला मध्यरात्री १२ ते पहाटे चारपर्यंत महामार्गांवर रात्री गस्त सुरू करण्यात आली आहे. यात, महामार्गांच्या मधल्या लेनवर वाहतूक पोलिस शाखेचे वाहन धिम्या गतीने गस्त करेल. या वेळी पाठीमागून आलेले लहान वाहन (कार) पोलिस वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकेल. मात्र, अवजड वाहन जर ओव्हरटेक करून पुढे जात असेल तर पुढे नाकाबंदीच्या ठिकाणी त्या अवजड वाहनांना रोखले जाईल.

वाहनचालकास वाहतूक नियमांची समज दिली जाईल. अवजड वाहनचालकाने त्याचे वाहन रस्त्याच्या डाव्या वा मधल्या लेनमधून चालवावे. जेणेकरून पाठीमागून वेगात येणाऱ्या लहान वाहनाला (कार) उजव्या लेनने जाणे सोयीस्कर ठरेल. यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार गेल्या आठवडाभरापासून रात्रीची ट्रॅफिक पोलिसांची गस्त सुरू करण्यात आलेली आहे.

"शहराच्या २३ किलोमीटर अंतराच्या महामार्गावर अपघात होऊ नये, ते शून्यावर यावेत यासाठी ‘मूव्हिंग बॅरिकेडिंग’ ही संकल्पना वाहतूक शाखेसमोर मांडली. तिचे सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसांत दिसू लागतील. यात जर चांगले यश मिळाले तर महामार्ग प्राधिकरण आणि स्मार्टसिटी कंपनीला समाविष्ट करून त्याची व्यापती वाढविण्याचा प्रयत्न राहील."

-जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त, नाशिक

Nashik Police Commissioner jayant naiknavare Latest News
संततधार पावसाने जनजीवन विस्कळित; ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com