Nashik Police : आठवडाभर पोलिसांच्या सुट्ट्या रद्द! 20 तारखेपर्यंत अधिकारी- अंमलदार ‘ऑनड्युटी’

Lok Sabha Election 2024 : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदानासाठी पोलिस यंत्रणेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
Police Holiday Cancel
Police Holiday Cancelesakal

Nashik Police : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २० तारखेला मतदान होते आहे. या पार्श्वभूमीवर आगामी दहा दिवसांसाठी शहर -जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, आगामी दहा दिवस पोलीस यंत्रणा ‘ऑनड्युटी’ राहणार आहेत. (Police holidays cancelled for week Officers on duty till 20th)

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदानासाठी पोलिस यंत्रणेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कडेकोट बंदोबस्तासह पोलिसांची जादा कुमक येत्या आठवडाभरात शहरात दाखल होणार आहे. २० तारखेला नाशिक, दिंडोरी मतदारसंघात मतदान होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आयुक्तालय व नाशिक ग्रामीण पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांसह सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत. या काळात आणीबाणीच्या प्रसंगी वैद्यकीय रजा घेता येईल, परंतु त्यासाठीचे संबंधितांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

नेत्यांच्या प्रचारसभा

नाशिक, दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या बुधवारी (ता. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पिंपळगाव बसवंत येथे होते आहे. प्रचारासाठी येता आठवडाचा असल्याने सार्याच पक्षाच्या नेत्यांच्या सभा या आठवड्यात होत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या पवार गटाचे शरद पवार यांच्याही सभा होणार आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर प्रचार सभांसाठीच्या बंदोबस्ताचा ताण पडणार आहे. (latest marathi news)

Police Holiday Cancel
Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

असे आहे पोलीस दल

अधिकारी.......शहर............ग्रामीण

विशेष महानिरीक्षक ते निरीक्षक...... ७४ ........६१

सहायक ते उपनिरीक्षक......२०३.........१७८

सहायक उपनिरीक्षक ते शिपाई.........३०३६.........३२७२

एकूण.........३३१३.........३५११

Police Holiday Cancel
Nashik Police : दत्तक गुन्हेगारांच्या अंमलदारांना दणका! पोलीस उपायुक्तांची कारवाई; अंबडच्या चौघांवर कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com