पोलिस आणखी टोळ्यांवर मोक्का लावण्याच्या तयारीत! दहशती कारवायांना बसणार आळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

पोलिस आणखी टोळ्यांवर मोक्का लावण्याच्या तयारीत!

नाशिक : भूमाफियागिरीसह खुनाच्या आरोपातील २२ जणांवर मोक्काची(Maharashtra Control of Organised Crime Act) कारवाईनंतर पोलिसांच्या रडारवर आता नाशिक रोड व भद्रकालीतील सराईत आले आहे. गुरुवारी (ता.२०) पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील संशयितांची विशेष न्यायालयाकडून चौकशीसाठी कोठडी घेतली आहे. आतापर्यंत २२ जणांवर कारवाईचा बडगा उगारताना पोलिसांनी इतर प्रमुख टोळ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी सुरु केलेल्या गंभीर कारवायामुळे खऱ्या अर्थाने गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या दहशती कारवायांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Nashik police ready for action against criminals)

मोक्काच्या विक्रमी कारवाया

नाशिक रोडला अल्पवयीन मुलीला शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक अत्याचाराच्या घटनेतील संशयितांनी संघटित गुन्हेगारीची पार्श्वभूमी विचारात घेउन पोलिसांनी बलात्कारातील(Rape) संशयितांवर माोक्का(Mokka)अंर्तगत कारवाई करता येते का, याचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांची संघटित गुन्हे करण्याची पार्श्वभूमी असल्याने विशेष न्यायालयाकडे तपासासाठी न्यायालयात २७ मेपर्यंत पोलिस कोठडी मागितली आहे. दुसऱ्या घटनेतील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडाळा नाका परिसरातील आकाश रंजवे खून (Murder)प्रकरणातील संशयितांचा पूर्व इतिहास हा गुन्हेगारीचा असल्याने त्यातील संशयितांच्या मोक्का तपास करण्यासाठी विशेष न्यायालयाकडे पोलिस कोठडी मागितली असता त्या गुन्ह्यातील संशयितांना सोमवार (ता.२४) पर्यत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगाराविरोधात कारवाया(police action) सुरु केल्या आहेत. कारवाई करताना गेल्या १० वर्षात झाल्या नाही तेवढ्या विक्रमी २२ जणांवर मोक्काच्या कारवाया केल्या.

हेही वाचा: CCTV चोरट्याला अवघ्या २४ तासांत केले जेरबंद

loading image
go to top