CCTV चोरट्याला अवघ्या २४ तासांत केले जेरबंद; पंचवटीच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police arrest thief

CCTV चोरट्याला अवघ्या २४ तासांत केले जेरबंद

म्हसरूळ (जि. नाशिक) : पंचवटीतील येथील हनुमानवाडी परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून सीसीटीव्ही(CCTV), डीव्हीआर(DVR), राउटर(Router) आदी साहित्यावर डल्ला मारणाऱ्या संशयिताला अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात पंचवटीच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.(Panchavati crime investigation team arrested CCTV thief in just 24 hours)

तपास लावायला तंत्रज्ञानाचा उपयोग

रेणुका कन्स्ट्रक्शनचे इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे(CCTV camera) बसविण्यात आले होते. चोरट्यांनी येथील तीन सीसीटीव्ही कॅमेरे, एक डीव्हीआर(DVR) व हार्डडिस्क(Hard disk), एक राउटर आणि एक मॉडेल(model) असे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी तुकाराम वामन कटाळे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, सहाय्यक उपनिरीक्षक बाळनाथ ठाकरे, माळोदे, योगेश देवरे, किरण सानप, विलास चारोस्कर, नितीन जगताप यांनी तपासाची चक्रे फिरवीत तांत्रिक साधनाचा वापर केला आणि संशयित सागर विठ्ठल दाते (रा. जाधव कॉलनी, मखमलाबाद रोड) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला.

हेही वाचा: Vi चा बंपर धमाका; 6 कोटी ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज

हेही वाचा: सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर ‘कोविड हॉस्पिटल्स’; रुग्णांच्या जिवाशी खेळ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusNashikthief
loading image
go to top